Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

| Updated on: Apr 25, 2021 | 4:30 PM

स्टेट बँक फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 17900 ते 47920 रुपयांपर्यंत पगार मिळेल. State Bank of India announced Vacancy for Pharmacist

Bank Job 2021: स्टेट बँकेत या पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार
एसबीआयने एक विशेष ठेव योजना एफडी किंवा मुदत ठेवमध्ये ऑफर केली, ज्या अंतर्गत सर्व ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज द्यावे, असे सांगितले गेले. प्लॅटिनम डिपॉझिट नावाची ही नवीन योजना फक्त काही दिवसांसाठी आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार ही योजना 14 सप्टेंबर रोजी बंद होईल. SBI ने म्हटले आहे, 'स्वातंत्र्याची 75 वी वर्ष साजरी करण्याची वेळ आली आहे. एसबीआयमध्ये मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींवर विशेष लाभ दिले जात आहेत. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध आहे.
Follow us on

नवी दिल्ली: बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 67 पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी स्टेट बँकेने जारी केलेल्या अधिकृत सूचना तपासणं आवश्यक आहे. फॉर्ममध्ये कोणतीही चूक आढळल्यास फॉर्म नाकारला जाऊ शकतो. (State Bank of India announced Vacancy for Pharmacist and various post know details here)

क्लेरिकल केडर फार्मासिस्टचं नोटिफिकेशन कुठं पाहावं?

जे उमेदवार क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करु इच्छितात त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाईट sbi.co.in/careers यावर भेट द्यावी. ही पदभरती D.Pharma आणि B Pharma अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत 3 मेपर्यंत आहे.

या तारखा लक्षात ठेवा

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 13 मार्च 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 मे 2021
एसबीआय फार्मासिस्ट परीक्षेची तारीख – 23 मे 2021

कोण अर्ज करू शकेल?

क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी (डी. फार्म) किंवा फार्मसी (बी फार्मा / एम फार्मा / फार्मा डी) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. फार्मासिस्टमध्ये डिप्लोमा पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा. जे अर्ज करणार आहेत ते sbi.co.in/careers वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 17900 ते 47920 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

संबंधित बातम्या:

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या ‘किंगमेकर’ नेत्याची बाजी

Video : अश्विन, कुलदीप आणि हार्दिकचा जबरदस्त डान्स, साऊथ इंडियन गाण्यावर धरला ताल

(State Bank of India announced Vacancy for Pharmacist and various post know details here)