नवी दिल्ली : सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) गेल्या आर्थिक वर्षात 43,000 तरुणांना नोकरी दिली होती. तर या आर्थिक वर्षात (Fiscal Year) 2022 मध्ये ही संख्या तब्बल 1 लाखांच्या वर गेली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी 2023 कंपनीने 40,000 तरुणांना नोकरी (Jobs) देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तरुणाईला संधी देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु ठेवली आहे.
या जुलै ते सप्टेंबर 2022 या दरम्यान या आयटी कंपनीने 9,840 तरुणांना नोकरी दिली आहे. तर जवळपास 20,000 फ्रेशर्सची भरती केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी 45,000 ते 47,000 फ्रेशर्संना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत कंपनीने 35,000 तरुणांना कामावर ठेवले आहे.
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनीने असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांना आणखी एक सूखद धक्का दिला आहे. कंपनीने 70 टक्के कर्मचाऱ्यांसाठी 100 टक्के वेतनातील बदल सुनिश्चित केला आहे. कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी वेतनासंबंधीचा मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, 30 कर्मचाऱ्यांना त्यांच्या युनिटच्या प्रदर्शनानुसार, वेतन देण्यात येणार आहे.
टीसीएस कंपनीने मूनलाईटिंगवर पुन्हा एकदा कडक भूमिका जाहीर केली आहे. मूनलाईटिंग हे नैतिकतेच्या विरोधात असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या मुद्यावरुन अजून एकाही कर्मचाऱ्याविरोधात कार्यवाही केली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनीमध्ये 6.16 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.
कंपनीने आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस कार्यालयात येण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. 6,16,171 कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येतात. तर बाकीच्या दिवशी त्यांना घरून काम करण्याची मूभा देण्यात आली आहे.