नोकरी सोडून व्यावसाय सुरू करायचा विचार करत आहात? निर्णय घेण्याआधी या गोष्टी लक्षात असू द्या

| Updated on: Feb 15, 2023 | 3:07 PM

व्यवसाय किंवा नोकरी यापैकी तुमच्यासाठी काय योग्य आहे याची कल्पना असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण सर्वच जण व्यवसायाचे चकाचक जग पाहतो, परंतु त्यात येणाऱ्या समस्यांची आपल्याला कल्पना नसते.

नोकरी सोडून व्यावसाय सुरू करायचा विचार करत आहात? निर्णय घेण्याआधी या गोष्टी लक्षात असू द्या
नोकरी की व्यावसाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, आजकाल, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे ही सोपी गोष्ट नाही. काम कुठलेही असो, त्यात ताणतणाव असणं सामान्य झालं आहे, मात्र अनेकांना ते हाताळता येत नाही. जर तुम्ही कॉर्पोरेट लाइफला (Corporate Job) कंटाळले असाल आणि एखाद्या स्टार्ट अप (Start Up) कल्पनेवर काम करू इच्छित असाल, तर तुम्हाला त्याचे वास्तव म्हणजेच व्यवसाय किंवा नोकरी यापैकी तुमच्यासाठी काय योग्य आहे याची कल्पना असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण सर्वच जण व्यवसायाचे चकाचक जग पाहतो, परंतु त्यात येणाऱ्या समस्यांची आपल्याला कल्पना नसते. ही गोष्ट लक्षात असू द्यावी की, समोरच्या व्यक्तीचे आयुष्य दिसते तितके सोपे नसते.  स्टार्ट अप कल्पनेवर काम करण्यापूर्वी, नोकरी आणि व्यवसायातील फरक जाणून मगच एखादा निर्णय घेणे फायद्याचे ठरते.

वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाचा समतोल बिघडतो

व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवताच, काम आणि वैयक्तिक आयुष्यातील फरक नाहीसा होऊ लागतो. सुट्टीचा विचारही मनात आला तरी कामाची लांबलचक यादी सतत मनात धावत राहते. झोपताना आणि जागे असताना, नेहमी फक्त कामाशी संबंधित गोष्टीच मनात घुमत राहतात.

कार्यालयीन सुविधा संपतात

कंपनीत काम करत असताना तुम्हाला तुमच्या कामाची सुरुवात छोट्या खोलीतून किंवा ऑफिसमधून करावी लागेल. तुमच्या व्यवसायात कॉफी मशीन, ऑफीस बाॅय, प्रिंटिंग मशीन इत्यादींची व्यवस्था करायला बराच कालावधी लागू शकतो.

हे सुद्धा वाचा

दरमहा पगार हमी अवघड

व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यातून नफा मिळवीण्यासाठी काही महिने ते वर्षे लागू शकतात. तुम्ही अनेक वर्षांपासून काम करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला ठराविक पगाराची सवय होईल. स्टार्टअपमध्ये निश्चित कमाई किंवा नफा मिळविण्यासाठी वेळ लागू शकतो.

प्रत्येकाला यश मिळेलच हे आवश्यक नाही

एखाद्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला त्याच्या स्टार्टअपमध्ये झटपट यश मिळाले असले तरी, तुमच्यासोबतही असे घडलेच हे आवश्यक नाही. प्रत्येक व्यवसाय योजना आणि त्यातील गुंतवणुकीचे पर्याय इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर स्वत:ची तुलना कोणाशीही करू नका.

फायदे तोटे

  • जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा स्वातंत्र्यासोबत जोखीमसुद्धा येते. नोकरी कशीही असली तरी तुम्हाला तुमचा ठराविक पगार वेळेवर मिळेल. व्यवसायात नुकसान हे पूर्णपणे तुमचे नुकसान असेल.
  • व्यवसायात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार रजा घेऊ शकता, परंतु जर तुम्हीच तो व्यवसाय सांभाळत असाल, तर तुम्हाला सुट्टी घेणे सोपे जाणार नाही.
  • आता तुम्ही बघितलेच असेल की कोणताही सण किंवा कार्यक्रम आला की नोकरदार लोकं सुट्टीचा आनंद लुटत असतात तर बिझनेसमध्ये त्या वेळी तुमचे काम आणखी वाढते. त्या वेळी तुमचे उत्पन्नही वाढले असले तरी नोकरदार लोकांच्या तुलनेत तुम्हाला सणांचा आनंद घेता येणार नाही.