UPSC Exam : कोरोनामुळे UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी

| Updated on: Feb 05, 2021 | 5:06 PM

कोरोना संकटाच्या काळात 2020 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी दिली जाणार आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतला आहे.

UPSC Exam : कोरोनामुळे UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी
Follow us on

नवी दिल्ली : UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटाच्या काळात 2020 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी दिली जाणार आहे. केंद्रिय लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतला आहे. मात्र ही परीक्षा त्यांनाच देता येणार आहे, ज्यांच्यासाठी 2020 ही अंतिम संधी होती. मात्र, ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे परीक्षा देऊ शकले नाहीत. केंद्र सरकारने ही संधी काही अटींवर देऊ केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं आहे. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.(Another chance for the candidates who could not appear for the UPSC exam due to the Corona)

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या वर्षी ज्या उमेदवारांसाठी UPSC परीक्षा देण्याची अंतिम संधी होती. पण कोरोना विषाणूच्या संकटामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत. तसंच वयोमर्यादेनुसार ते या वर्षीच्या परीक्षेला बसू शकणार नव्हत, अशा उमेदवारांना एक अतिरिक्त संधी देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

IFS Mains परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCने भारतीय वन सेवा अर्थात IFS मुख्य परीक्षा 2020चे अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. IFS mains परीक्षेचे अॅडमिट कार्ड त्यांची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जारी करण्यात आले आहेत. उमेदवार या वेबसाईटवर जाऊन आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात.

कोणतीही परीक्षा न देता नोकरीची संधी

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (UPSC) तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता केंद्र सरकारसोबत नोकरी करण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक पदांवर भरती (UPSC recruitment 2021) सुरू केली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या नोकरभरतीसंदर्भात UPSC च्या अधिकृत वेबसाईटवरून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या जागांवर अर्ज करण्यासाठी 11 फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

UPSC कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 296 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डेटा डेटा प्रोसेसिंग असिस्टेंट, असिस्टेंट पब्लिक प्रॉसिक्युटर, जूनिअर टेक्निकल ऑफिसर, स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर, लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) आणि असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

RBI Recruitment 2021 : ज्युनिअर इंजिनीअरच्या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

Job Alert: दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अनेक पदांवर भरती

Another chance for the candidates who could not appear for the UPSC exam due to the Corona