4 वेळा अपयश पाचव्या प्रयत्नात थेट 39 वी रँक, IAS रुचि बिंदल यांची प्रेरणादायी कहाणी

| Updated on: Mar 20, 2021 | 5:20 PM

सलग चार परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर रुचि बिंदल यांनी पाचव्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकावला. UPSC IAS Ruchi Bindal

4 वेळा अपयश पाचव्या प्रयत्नात थेट 39 वी रँक, IAS रुचि बिंदल यांची प्रेरणादायी कहाणी
रुचि बिंदल
Follow us on

UPSC IAS Success Storyनवी दिल्ली : भारतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक क्रेझ नागरी सेवा परीक्षांतून आयएएस होण्याची असते. IAS परीक्षा देताना कधी कधी अपयश येत त्यामुळे खचून जाण्यापेक्षा विद्यार्थी पुन्हा जोमानं तयारी करतात आणि यश मिळवतात. राजस्थानच्या रुचि बिंदल यांची कहाणीदेखील काहीशी अशीच आहे. सुरुवातीला सलग चार परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर रुचि बिंदल यांनी पाचव्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकावला. 2019 मध्ये त्यांनी 39 वी रँक मिळवत यूपीएसीच्या IASपरीक्षेत यश मिळवलं.(UPSC IAS success story know how Ruchi Bindal cracks civil services exam in 5th attempt)

रुचि बिंदल यांच्याकडून वडिलांचं स्वप्न पूर्ण

रुचि बिंदल यांच्या वडिलांना रुचिनं जिल्हाधिकारी व्हावं, असं वाटायचे. रुचिनं जिल्हाधिकारी व्हावं, असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. रुचि या मूळच्या राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील मकराना तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी राजस्थानातील श्रीराम कॉलेजमधून बीए पदवीचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी 2016 मध्ये जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात मास्टर ऑफ आर्टसची शिक्षण घेण्यसाठी गेल्या. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना रुचि यांनी यूपीएसीच्या नागरी सेवांची तयारी सुरु केली.

4 वेळा अपयश पाचव्यांदा यशाला गवसणी

रुचि बिंदल यांचा IAS बनण्याचा प्रवास तसा खडतर होता. 4 वेळा अपयश आल्यानंतर रुचि बिंदल यांनी 5 व्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा क्रॅक केली. रुचि यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा, 2015 ला दुसऱ्यांदा, 2016 मध्ये तिसऱ्यांदा, 2017 मध्ये चौथ्यावेळी परीक्षा दिली. 2017 मध्ये रुचि या पूर्व परीक्षेत पास झाल्या होत्या. रुचि यांनी यापुढे पुन्हा प्रयत्न सुरु ठेवले. 2019 मध्ये पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या निवासी कोचिंग अकॅडमीमध्ये पुढील तयारी केली. पुढे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळवून रुचि बिंदल यांनी 2019 मध्ये 39 वी रँक मिळवली.

संबंधित बातम्या:

अधिकाऱ्यांनी झिडकारलं, मग ठरवलं IAS व्हायचं, लाखाची नोकरी सोडून UPSC मध्ये यश मिळवणारा पठ्ठ्या

UPSC CMS Reserve List 2021 : आयोगाकडून राखीव उमेदवारांची यादी जाहीर, अधिकृत वेबसाईटवरुन करा डाऊनलोड

(UPSC IAS success story know how Ruchi Bindal cracks civil services exam in 5th attempt)