UPSC IES/ISS Recruitment 2021: आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

| Updated on: Apr 26, 2021 | 3:16 PM

UPSC IES/ISS Recruitment 2021 भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 27 मे अखेरचा दिवस आहे.

UPSC IES/ISS Recruitment 2021: आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
Follow us on

UPSC IES/ISS Recruitment 2021 नवी दिल्ली:केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसीतर्फे घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 27 मे अखेरचा दिवस आहे. जे उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करत आहेत ते यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. इंडियन इकोनॉमिक सर्विस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस (ISS) भरती प्रक्रियेअंतर्गत 26 पदांवर भरती होणार आहे. ( UPSC IES ISS Recruitment 2021 application last date tomorrow check details)

UPSC IES/ISS Recruitment 2021 साठी अर्ज कसा करावा

स्टेप 1: यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2: तिथे Recruitment वर क्लिक करा.
स्टेप 3: आता ‘Online Application for Lateral Recruitment’ लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: पुढे Indian Statistical Service Examination किंवा Indian Economic Service Examination या लिकंवर क्लिक करा
स्टेप 5: अ‌ॅप्लिकेशनच्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
स्टेप 6: रजिस्ट्रेशननंतर अर्ज सादर करा.
स्टेप 7: संपूर्ण तपशील योग्यपणे भरलाय का पाहा आणि सबमिट करा .
स्टेप 8: अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट सोबत ठेवा

परीक्षा फी

यूनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, इंडियन इकॉनॉमिक सर्विस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विसच्या परीक्षेसाठी खुल्या आणि ओबीसी गटातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी, एसटी आणि दिव्यांग आणि महिला उमेदवारंना कोणतीही फी भरावी लागणार नाही. परीक्षा फी भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.

या शहरांमध्ये होणार परीक्षा

UPSC IES/ISS Recruitment 2021 ची लेखी परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरु, कोलकाता, भोपाल, लखनऊ, चंडीगड, मुंबई, रायपुर, चेन्नई, पाटणा, कटक आणि प्रयागराज या शहरांमध्ये होईल. याशिवाय दिल्ली, दिसपुर, शिमला, हैदराबाद आणि जयपूरमध्येही परीक्षेचे आयोजन केले जाऊ शकते. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे..

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत 100 जणांची भरती; झटपट अर्ज करा

( UPSC IES ISS Recruitment 2021 application last date tomorrow check details)