नवी दिल्ली : कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र, अनलॉक अंतर्गत आता सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. यूपीएससीनेही (UPSC) रखडलेल्या स्पर्धा परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार यूपीएससीकडून आयएफएस (IFS) 2020 च्या मुख्य परिक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी 2021 ते 7 मार्च 2021 या कालावधीमध्ये आयएफएस मुख्यच्या परीक्षा होतील. (UPSC IFS main 2020 exam will start from february 2021)
ज्या उमेदवारांनी आयएफएसची पूर्व परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेली आहे. त्या सर्वांना ही मुख्य परीक्षा देता येईल. या परीक्षेबाबतची सर्व माहिती upsc.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितप्रमाणे आयएफएसची मुख्य परीक्षा दोन सत्रांत घेतली जाईल.
यामध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत पहिले सत्र असेल, तर दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत परीक्षा होईल. 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत या परीक्षा होतील. आयएफएसची परीक्षा भोपाळ, चेन्नई, दिल्ली, दिसपूर (गुवाहाटी), हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, नागपूर, पोर्ट ब्लेयर आणि शिमला या मुख्य शहरांत आयोजित केली जाऊ शकते. हॉल तिकीट परीक्षेच्या दोन आठवड्यांपूर्वी उपलब्ध करुन दिले जातील.
….तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची ही मुलगी सर्वात आधी गोळी झेलेल, दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज दुमदुमलाhttps://t.co/j6IUU5mWXU @rajushetti @poojamorespeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
सबंधित बातम्या :
UPSC Civil Exam Results | यूपीएससी 2019 निकाल …
UPSC Revised Timetable | यूपीएससी …