नवी दिल्ली : नोकरीची संधी शोधत असणाऱ्यांना तरुणांना मोठी संधी चालून आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी भरतीची (UPSC Recruitment 2023) अधिसूचना काढली आहे. तज्ज्ञ श्रेणी III, सहायक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पदासाठी अर्ज करावा. या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जून निश्चित करण्यात आली आहे. तर उमेदवार 30 जूनपर्यंत अर्ज प्रिंट करु शकतात. upsconline.nic.in याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
या पदासाठी अर्ज प्रक्रिया
इतके आहे शुल्क
या पदांना अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत शुल्काचा भरणा करावा लागेल. अर्थात आता नवीन तांत्रिक आयुधांसह त्यांना शुल्क भरता येईल. उमेदवार नेट बँकिंगचा वापर करु शकतो. तो व्हिसा, मास्टर, रुपे, क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करुन या पदासाठी शुल्क जमा करु शकतो. या पदासाठी अर्जदाराला केवळ 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यांना शुल्क सवलत जाहीर करण्यात आली आहे.
याठिकाणी करा क्लिक
तर वय, इतर अर्हता, आरक्षण आणि इतर माहितीसाठी, सविस्तर तपशीलासाठी उमेदवारांना युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. याविषयीची अधिसूचना युपीएससीने काढली आहे. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी अर्ज करण्याची विस्तृत, तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तुमच्या मनातील सर्व शंका याठिकाणी दूर होतील. तुम्हाला युपीएससीने जाहीर केलेली अधिसूचना या ठिकाणी क्लिक करुन पाहता येईल.