नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यूपीएससीकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मु्ख्य परीक्षा 7 ते 9 जानेवारी आणि 15 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात नोटिफिकेशन वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे. तर, मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारा डीएफ जारी करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तो यूपीएसचीच्या वेबसाईटवर भरावा लागणार आहे.
7 जानेवारीला पेपर क्रमांक 1, 8 जानेवारीला जनरल स्टडीज पेपर क्रमांक 1, जनरल स्टडीज पेपर क्रमांक 2 आणि 9 जानेवारीला जनरल स्टडीज पेपर क्रमांक 3 आणि जनरल स्टडीज पेपर क्रमांक 4 होणार आहे. तर 15 जानेवारीला भारतीय भाषा, इंग्रजी आणि 16 जानेवारीला वैकल्पिक विषयांचे दोन पेपर होणार आहेत.
वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा
DAF अर्ज सादर करण्यासाठी इथं क्लिक करा
जे विद्यार्थी किंवा उमेदवार नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मुख्य परीक्षेसाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाला यूपीएससीकडून डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म-1 असं म्हटलं जाते. डीएफमध्ये विद्यार्थ्यांना जन्म तारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज अपलोड कराव्या लागतात. मुख्य परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आलेलं शुल्क देखील विद्यार्थ्यांना भरावं लागेल. खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 200 रुपये शुल्क भरावं लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्क द्यावं लागणार नाही.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यावर उमेदवारांकडून अर्ज दाखल करुन घेते. पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षेसाठी डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म सादर करावा लागतो. तर, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी डीएफ-2 अर्ज सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येत नाही. मुलाखतीच्या अर्जात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम विचारले जातात. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांचे पर्याय उपलब्ध असतात.
यूपीएससीकडून मुख्य परीक्षेसाठी डीएएफ सादर करण्याची लिंक 22 नोव्हेंबरला अॅक्टिव्ह करण्यात आली असून ती 1 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
Upsc union public serive commission declared civil services mains 2021 exam dates and daf at upsc gov in