नवी दिल्ली : अणु क्षेत्रातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत आणि देशात आण्विक उर्जा प्रकल्प चालवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) ने 72 पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. कंपनीने दिलेली जाहिरात क्र NPCIL/HRM/2021/02 नुसार तांत्रिक अधिकारी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ आणि जीडीएमओ), उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि स्टेशन अधिकारी या पदासाठी भरती केली जाईल. (vacancy in Nuclear power corporation for technical officer and other post)
एनपीसीआयएल भर्ती 2021 च्या जाहिरातानुसार, जाहिरात करण्यासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनपीसीआयएलने अधिकृत वेबसाईट npcilcareers.co.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि उमेदवार 20 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. एनपीसीआयएलच्या जाहिरातीनुसार कंपनीने जाहीर केलेल्या विविध पदांसाठी एकूण 72 रिक्त पदांचा समावेश आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी (तज्ज्ञ)च्या रिक्त जागांमध्ये फिजिशियन, बालरोग तज्ञ, जनरल सर्जन, डेंटल सर्जन आणि रेडिओलॉजिस्ट या पदांचा समावेश आहे.
टेक्निकल ऑफिसर (मेकेनिकल) – 28 पद
टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल) – 10 पद
टेक्निकल ऑफिसर (सिविल) – 12 पद
मेडिकल ऑफिसर (स्पेशालिस्ट) – 8 पद
मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) – 7 पद
डिप्टी चीफ फायर ऑफिसर – 3 पद
स्टेशन ऑफिसर – 4 पद
तथापि, एनपीसीआयएलने जाहीर केलेल्या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. या तपशीलांसाठी उमेदवारांनी कंपनीच्या भरती पोर्टल तसेच अधिकृत वेबसाईट npcil.nic.in वर वेळोवेळी भेट द्या. (vacancy in Nuclear power corporation for technical officer and other post)
Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर#Chehre | @SrBachchan | @emraanhashmi | @Tweet2Rhea | #coronavirus | #Entertainment https://t.co/o9mhgUJWeK
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
इतर बातम्या
LIC च्या ‘या’ विशेष पॉलिसीमध्ये 31 मार्चपूर्वी करा गुंतवणूक, मोठे फायदे मिळणार
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 38 कोटींचा निधी मंजूर