पहिला भारतीय आयएएस कोण? ज्यानं इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा फोडला

| Updated on: Mar 16, 2021 | 4:17 PM

1854 पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांनी शिफारस केलेल्या व्यक्तींची निवड प्रशासकीय कामासाठी करत असे. first Indian IAS officer

पहिला भारतीय आयएएस कोण? ज्यानं इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा फोडला
यूपीएससी
Follow us on

नवी दिल्ली: भारतात सर्वाधिक प्रतिष्ठेची नोकरी म्हणून आयएएस आणि आयपीएसला पसंती दिली जाते. देशातील लाखो युवक नागरी सेवांच्या परीक्षांची तयारी करतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात. काही विद्यार्थ्यांची परीक्षेतून अधिकारीपदावर निवड होते तर काही जण पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीला लागतात. नागरी सेवा परीक्षांमधून आयएएस झालेली पहिली व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. (Who is first Indian IAS officer what is connection with Rabindranath Tagore)

1854 नंतर परीक्षेला सुरुवात

1854 पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांनी शिफारस केलेल्या व्यक्तींची निवड प्रशासकीय कामासाठी करत असे. गुंतवणूकदारांनी शिफारस केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षणासाठी हेलीबरी कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जायचं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारतामध्ये नियुक्ती दिली जायची. ईस्ट इंडिया कंपनीच्या या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर इंग्लंडच्या संसदेत यावर चर्चा झाली. सिलेक्ट कमिटीनं लॉर्ड मेकॉले रिपोर्टच्या आधारावर प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावानुसार भारतात अधिकारी नियुक्त करण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्याच ठरवलं गेले. 1854 मध्ये लंडनमध्ये पहिला सिव्हील सर्विस कमिशन स्थापन करण्यात आला. 1855 मध्ये नागरी सेवा परीक्षेला सुरुवात झाली.

लंडनमध्ये परीक्षा

ब्रिटीश सरकारनं सिव्हील सर्विस कमिशन स्थापन करुन आयएएस निवडण्यास सुरुवात केली. पण त्यामध्ये भारतीयांना प्रवेश मिळू नये म्हणून परीक्षा भारतात न घेता लंडनमध्ये घेण्यात येत होती. तर, वयाची अट 18 ते 23 वर्ष इतकी ठेवण्यात आली. भारतीयांना संधी मिळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे पहिल्या 10 वर्षात भारतीय व्यक्ती आयएएस होऊ शकला नाही.

इंग्रजांच्या भ्रमाचा भोपळा फुटला

इंग्रज सरकारनं आयएएस परीक्षा भारतात न घेता त्यांच्या देशात घेऊन भारतीयांना त्यामध्ये सहभागी होण्यापासून रोखलं होते. मात्र, 1864 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर यांनी आयएएस परीक्षेत यश मिळवलं. सत्येंद्रनाथ टागोर आयएएस परीक्षेत यशस्वी होणारे पहिले भारतीय ठरले. सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 मध्ये झाला होता. 1857 ला ते हिंदू कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. सत्येंद्रनाथ टागोर यांची पहिली नेमणूक बॉम्बे प्रांतामध्ये करण्यात आली होती, काही महिन्यामध्येच त्यांची बदली अहमदाबादला करण्यात आली.

सत्येंद्रनाथ टागोर

सत्येंद्रनाथ टागोर यांनी लोकमान्य टिळक आणि संत तुकाराम यांचं साहित्य बंगाली भाषेमध्ये भाषांतरित केले. त्यांनी काही पुस्तकांचं लेखन देखील केलं असून ते ब्राह्मो समाजाशी देखील संबंधित होते. सत्येंद्रनाथ टागोर हे थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ होते. पुढे तीन वर्षानंतर 4 भारतीयांनी एकाचवेळी यश मिळवले. पुढे प्रदीर्घ लढ्यानंतर आयएएस परीक्षा 1922 मध्ये भारतात होण्यास सुरुवात झाली.


संबंधित बातम्या:

जी. श्रीकांत यांच्यासह राज्यातील 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे, मुंबईमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे बदल, ‘या’ महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

(Who is first Indian IAS officer what is connection with Rabindranath Tagore)