नवी दिल्ली : सध्या लोकं प्रेमात इतकी आंधळी होऊन गेली आहेत की ती प्रेमात काहीही करू शकतात. त्यात (Extra Marital Affair) एक्स्ट्रा मॅरेज अफेर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यातून हत्येच्या अनेक घटनाही घडताना दिसतात. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेच्या प्रियकराने तिच्याच मुलीला सोबत घेऊन तिला संपवून टाकलं. नेमकं असं काय घडलं की प्रियकराने इतका मोठा निर्णय घेतला.
सात वर्षांपूर्वी लक्ष्मी भट्ट या महिलेने जितेंद्र भट्ट नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं होतं. लक्ष्मी भट्ट यांना पहिल्या लग्नानंतरची मुलगी (17 वर्षीय) होती. तसेच लक्ष्मी यांचं दुसरं लग्न होऊन देखील त्यांचं योगेश (37 वर्षीय) सोबत नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. याबाबत लक्ष्मीच्या मुलीला सर्व माहिती होती. तसेच योगेश हा एक चित्रकार होता. त्यामुळे बऱ्याचदा ती मुलगी योगेश सोबत त्याच्या चित्रकलेच्या अनेक कार्यक्रमांना जात होती. काही दिवसानंतर ती योगेशच्या खूप जवळ आली होती आणि त्याच्या प्रेमात पडली.
योगेश हा लक्ष्मी घरी नसताना कित्येकदा मुलीला भेटण्यासाठी घरी जात होता. काही दिवसांनी लक्ष्मी यांना दोघांच्या नात्याची कुणकुण लागली. यावरून लक्ष्मी आणि तिच्याच मुलीमध्ये जोरदार भांडण झालं आणि तिने योगेश याला घरी यायला विरोध केला. मात्र लक्ष्मीच्या मुलीला हे काही पटलं नाही. तिने योगेशसोबत एक कट रचला आणि जन्मदात्या आईलाच संपवण्याचा निर्णय घेतला.
तिघे एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे लक्ष्मी यांना तिच्या मुलीले गोड बोलून योगेशसोबत समुद्रकिनाऱ्यावर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर आड बाजूला घेऊन जात योगेश याने लक्ष्मी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत संपवलं. जुलै महिन्यात हे सर्व काही घडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आता या गुन्ह्याचं गुढ उकललं. दोघांवर संशय आला म्हणून पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर दोघांनाही सर्व काही कबूल केलं. योगेश आणि अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुजरातमधील आहे.