हमीरपूर : हिमाचल प्रदेशातील ऊना येथे गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार पलटल्याची घटना घडली आहे. या कार अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर ऊना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर गंभीर जखमी महिलांना चंदिगडला रेफर करण्यात आले आहे. याप्रकरणी ऊना पोलिसांनी अपघाती मृ्त्यूची नोंद केली आहे.
घटनेवेळी कारमध्ये 11 लोक होते. सर्व रविवारी दुपारी ऊना जिल्ह्यातील बदाहर गावी आपल्या घरी परतत होते. गावाजवळ पोहताच चालकाला हृदयविकाराचा झटका आला.
चालाकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार अनियंत्रित झाली आणि पलटी झाली. या अपघातात कारमधील सर्व जण जखमी झाले. चालकासह सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच ऊना पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत बचावकार्य सुरु केले. दोन गंभीर जखमींना चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
मदन लाल, कृष्णा, माया देवी, उर्मिला देवी, प्रवीण कुमारी, साक्षी, सिमरन, प्रभजोत, गुरबचनी देवी, प्रोमिला देवी आणि ड्रायव्हर अशोक कुमार अशी अपघातात जखमींची नावे आहेत.