झटपट पैसे कमावण्याची हाव भारी पडली, पार्टटाईम जॉबच्या नावाखाली युट्यूब व्हिडिओ लाईक करायला सांगितले मग…

| Updated on: Jun 19, 2023 | 4:52 PM

हल्ली पार्टटाईम नोकरीच्या माध्यमातून झटपट जास्त पैसे कमविण्याचे आणिष दाखवत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे.

झटपट पैसे कमावण्याची हाव भारी पडली, पार्टटाईम जॉबच्या नावाखाली युट्यूब व्हिडिओ लाईक करायला सांगितले मग...
परदेशी व्यावसायिकाची 17 कोटींची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
Image Credit source: freepik
Follow us on

वसई : झटपट पैसे कमावण्याची हाव एका व्यक्तीला चांगलीच भारी पडली आहे. पार्ट टाईम नोकरीतून जास्त पैसे कमावायला गेला अन् फसवणुकीला बळी पडला. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली एका 48 वर्षीय व्यक्तीला सुमारे 11 लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी 66D (संगणक संसाधनाचा वापर करून व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘अशी’ केली फसवणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसई येथील रहिवासी असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. 16 एप्रिल रोजी, त्याला एका अनोळखी महिलेकडून एक व्हॉट्सअॅप मॅसेज आला. यात तिने जाहिरात आणि सोशल मीडिया ब्रँडिंगशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या खाजगी कंपनीची प्रतिनिधी असल्याचे त्याला सांगितले. महिलेने त्याला पार्टटाईम नोकरीची ऑफर देत दररोज 500 ते 1500 कमावण्याचे आमिष दाखवले.

यानंतर त्याला एक व्हिडिओ लिंक पाठवण्यात आली आणि प्रति लाईक ₹50 मिळवण्यासाठी त्याला व्हिडिओ लाईक करण्यास सांगण्यात आले. काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या बँक खात्यात ₹50 देखील जमा करण्यात आले. आरोपींनी नंतर टेलिग्राम लिंक पाठवली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला एका ग्रुपमध्ये जॉईन केले. त्यानंतर त्याला ऑनलाईन कामे करण्यास सांगण्यात आले आणि एका महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ₹11.14 लाख भरण्यास प्रवृत्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मात्र आरोपींकडून पैशाची मागणी थांबतच नव्हती. अखेर या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याने गुरुवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.