श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath) गुहेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 50 जण जखमी (Injured) झाले आहेत. याशिवाय 48 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ढगफुटीची ही घटना आज सायंकाळी 5.30 वाजता घडली. या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी रात्रभर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी जेन-सेट आणि अलास्कन दिव्यांचा वापर केला जात आहे.
#WATCH | J&K: Massive amount of water flowing turbulently after a cloud burst occurred in the lower reaches of Amarnath cave. Rescue operation is underway at the site pic.twitter.com/w97pPU0c6k
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 8, 2022
एनडीआरएफचे प्रमुख अतुल करवाल यांनी सांगितले की, अमरनाथ गुहेच्या खालच्या भागात संध्याकाळी 5.30 वाजता ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. आमची 1 टीम गुहेजवळ तैनात आहे, त्या टीमने तातडीने बचावकार्य सुरू केले. या घटनेनंतर प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 01942496240, 01942313149 या क्रमांकांवर कॉल करून तुम्ही प्रवासाला निघालेल्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेऊ शकता.
J-K: 13 people killed, over 48 injured in Amarnath cloudburst
Read @ANI Story | https://t.co/HX004wVxLk#AmarnathCloudburst #JammuandKashmir #AmarnathYatra2022 pic.twitter.com/HI1AKgzn37
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2022
याशिवाय अमरनाथ जी यात्रा 2022 गेलेल्या यात्रेकरूंसाठी टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. 18001807198 (जम्मू), 18001807199 (श्रीनगर). दुसरीकडे, दिल्लीस्थित एनडीआरएफ क्रमांक 011-23438252 011-23438253, काश्मीर विभागीय हेल्पलाइन 0194-2496240, श्राइन बोर्ड हेल्पलाइन क्रमांक 0194-2313149
बाबा अमरनाथ जी की गुफा के पास बादल फटने से आयी फ्लैश फ्लड के संबंध में मैंने LG श्री @manojsinha_ जी से बात कर स्थिति की जानकारी ली है। NDRF, CRPF, BSF और स्थानीय प्रशासन बचाव कार्य में लगे हैं। लोगों की जान बचाना हमारी प्राथमिकता है। सभी श्रद्धालुओं की कुशलता की कामना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) July 8, 2022
या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, बाबा अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीमुळे आलेल्या पुराबाबत मी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली. एनडीआरएफ, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यात गुंतले आहेत. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. मी सर्व भक्तांना शुभेच्छा देतो.
प्रामुख्याने, मदत आणि बचाव कार्य संस्था याला मध्यम-स्तरीय अपघात मानत आहेत. आयटीबीपीच्या दोन कंपन्यांशिवाय एनडीआरएफच्या दोन तुकड्याही मदत आणि बचाव कार्यात तैनात आहेत. तंबूजवळ बचावकर्त्यांचे पथक होते, त्यामुळे अधिक प्रवाशांना वाचवता आले. मदतकार्य अजूनही सुरू आहे. (13 killed, 48 injured, 48 missing in cloudburst near Amarnath cave)