दिल्ली : आपल्या लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निघृण हत्या करीत तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलीसांनी अटक केलेल्या आरोपी आफताब पुनावाला याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्लीच्या साकेत कोर्टाने दिले आहेत. आरोपीच्या मागणीवरून न्यायालयाने त्याला तुरूंगात कायद्याची पुस्तके तसेच गरम कपडे पुरविण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात श्रद्धाच्या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तिची हत्या केल्यानंतर लपविलेले अवयव शोधण्यात यश आले होते. त्या हाडांच्या डीएनए नमून्यांशी तिच्या वडीलांचा डीएनए जुळला आहे. त्यामुळे घटनास्थळावरून सापडलेले केस आणि हाडे ही श्रद्घा वालकर हीचीच असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
या नमून्यांचा मायटोकॉन्ड्रीयल डीएनए रिपोर्ट श्रद्धाचे वडील आणि भाऊ यांच्याशी जुळत आहे. हे नमुने हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक्ससाठी लायब्ररी सेंटरमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. 18 मे 2022 रोजी, आफताब पूनावाला याने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते फ्रीझमध्ये ठेवले होते, त्यानंतर हे तुकडे दिल्लीच्या जंगलात फेकण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये, जेव्हा श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. आरोपी आणि मृत दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असून ते मे महिन्यात दिल्लीत स्थलांतरित झाले होते.