नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील औद्योगिक क्षेत्र सेक्टर पाचमध्ये एक दुर्घटना घडली. लिफ्टमध्ये फसून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा कंपनीचा सामान लिफ्टने वर नेत होता. परंतु, लिफ्ट खराब झाली. यात तो फसला. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. कंपनी संचालकावर बालमजुरी करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झालाय.
प्राप्त माहितीनुसार, कंपनीत कुलर बनविण्याचे काम सुरू आहे. येथे काही बालमजूर काम करतात. घटनेनंतर कंपनीचा मालक फरार झाला. पोलीस कंपनी मालकाचा शोध घेत आहेत. मृतकाचं नाव आलोक असं आहे. तो होलंबी येथील रहिवासी आहे. घटनेनंतर बालकाची नातेवाईक संतप्त झाले होते.
जानेवारी महिन्यात नरेला भागातील एका कंपनीत लिफ्ट पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना नारायणा इंडस्ट्रीयल भागात फेज एक ब्लाकमध्ये घडली होती. ३० वर्षीय कुलवंत सिंह, २६ वर्षीय दीपक कुमार आणि ३३ वर्षीय सनी अशी मृतकांची नाव आहेत. हे तिघेही जे. जे. कॉलनी प्रेमनगर येथील रहिवासी होते. या लिफ्ट दुर्घटनेनंतर आता ही दुसरी मोठी लिफ्ट दुर्घटना आहे. यात बालकाचा बळी गेला.
लिफ्टमध्ये केव्हा बिघाड होईल काही सांगता येत नाही. त्यामुळं लिफ्टचा मेंटनन्स योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. लिफ्ट जुनी झाली की, त्यात बिघाड निर्माण होतो, अशावेळी अशा दुर्घटना घडत असतात. नवी दिल्लीतील लिफ्ट दुर्घटनेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मालकाला अटक केव्हा होते. त्याच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.