आईच्या मोबाईलवर गेम खेळायचा, सायबर फ्रॉडमध्ये गमावले 2 लाख; घाबरलेल्या तरूणान जे केलं…

| Updated on: Apr 08, 2024 | 12:13 PM

सध्याच्या काळात सगळ्यांनाच मोबाईलचं वेड लागलं आहे. मात्र या याच काळात ऑनलाइन फसवणूक, फ्रॉड्सचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. अनेक जणांची ऑनलाइन फसवणूक होते. कधी नोकरीचं आमिष दाखवून तर कधी झटपट पैशाचा मोह दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यामध्ये लोकांची आयुष्यभराची कमाई जाते.

आईच्या मोबाईलवर गेम खेळायचा, सायबर फ्रॉडमध्ये गमावले 2 लाख; घाबरलेल्या तरूणान जे केलं...
Follow us on

सध्याच्या काळात सगळ्यांनाच मोबाईलचं वेड लागलं आहे. मात्र या याच काळात ऑनलाइन फसवणूक, फ्रॉड्सचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. अनेक जणांची ऑनलाइन फसवणूक होते. कधी नोकरीचं आमिष दाखवून तर कधी झटपट पैशाचा मोह दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यामध्ये लोकांची आयुष्यभराची कमाई जाते. यामुळे अनेकांना मोठा फटका बसतो, धक्काही बसतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यामुळे एका तरूणाने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्य संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथे ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या 18 वर्षांचा, कॉलेजमध्ये जाणारा हा तरूण त्याच्या आईच्या मोबाईलवर गेम खेळायचा. त्यावेळी त्याला एक संशयास्पद लिंक असणारा मेसेज आला. त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही मिनिटांमध्येच आणखी एक मेसेज आला, जो वाटून त्य़आला प्रचंड धक्का बसला. बँक खात्यातून 2 लाख रुपये डेबिट झाल्याचा तो मेसेज होते. त्यानंतर त्या तरूणाला समजलं की त्याची फसवणूक झाली आहे.

मात्र यामुळे तो तरूण प्रचंड घाबरला. एवढे पैसै गेल्यामुळे आई-वडील आपल्याला खूप ओरडतील या भीतीने त्याला घेरलं आणि त्याचं दडपणाखाली त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्याने स्वत:चं आयुष्य संपवून टाकलं. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत असून पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मात्र त्या तरुणाच्या घरातून कोणत्याही प्रकारची ‘सुसाईड नोट’ मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.