Kalayn : 13 जानेवारीपासून ती बेपत्ता होती, पडझड झालेल्या इमारतीत..

| Updated on: Jan 23, 2024 | 9:52 AM

कल्याण शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथे एकाच वेळेस दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचाही समावेश असून ती 13 जानेवारीपासूनच बेपत्ता होती.

Kalayn : 13 जानेवारीपासून ती बेपत्ता होती, पडझड झालेल्या इमारतीत..
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 23 जानेवारी 2024 : कल्याण शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथे एकाच वेळेस दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचाही समावेश असून ती 13 जानेवारीपासूनच बेपत्ता होती. कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह एका पडझड झालेल्या इमारतीत आढळून आला. तर त्याचवेळी एका तरूणाचा मृतदेह कल्याण रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळून आला. एकाच वेळेस दोन मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ माजली आहे. प्रेमप्रकरणातून या घटना घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास सुरू आहे.

इमारतीतून दुर्गंध आला म्हणून जाऊन पाहिलं तर…

कल्याण सिंडीकेट भागातील एका इमारतीमधून दुर्गंध येऊ लागल्याने तेथील नागरिकांनी पाहणी करत शोध घेतला. तेव्हा तेथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ते घाबरलेच. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि त्या मुलीच्या कुटुबियांचा शोध घेण्यात आला. ही मुलगी 13 जानेवारीपासून बेपत्ता होती, असे तपासात आढळले.

या मुलीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन मोबाईल आढळले. त्यामधील एक मोबाईल मृत अल्पवयीन मुलीचा होता. तर दुसरा मोबाईल रेल्वे मार्गावर उडी मारून आत्महत्या केलेल्या तरूणाचा असल्याचे आढळले. संबंधित तरूण जालना भागातील रहिवासी आहे. प्रेमप्रकरणातून त्याने अल्पवयीन मुलीची हत्या करून दुसऱ्या दिवशी स्वत:चं आयुष्य संपवलं असावं असा संशय पोलिसांना आहे. महात्मा फुले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.