पुणे.. एकेकाळी या शहराची ओळख विद्येचं माहरेघर अशी होती. पण गेल्या काही कालावधील या शहराची ही ओळख पुसली गेली असून गुन्हेगारांचा सुळसुळाट माजल्याचे दिसत आहे. रोजच्या रोज गुन्ह्यांच्या काही ना काही घटना समोर येतच असतात. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र हैराण झाले असून त्यांचे प्राण कंठाशी येतात. शहरात नुकतीच घडलेली एक घटना याचेच एक ताजं उदाहरण आहे. रांगेत उभं रहावं, हे बेसिक मॅनर्स आहेत, जे प्रत्येकाने पाळण्याची अपेक्षा असते. मात्र याच रांगेवरून वाद झाल्यानंतर दोन तरूणांनी एका तरूणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला आहे. “रांगेत न उभे राहता आधी मला पेट्रोल भरू दे” अशी धमकी देत त्या दोघांनी तरूणाला बेदम मारहाण केली. हडपसर भागात पेट्रोल पंपावर घडलेला हा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावर ही घटना घडली. काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. मात्र त्याच वेळी दोन तरूण त्यांची बाईक घेऊन तेथे आले आणि त्यांनी त्या तरूणाच्या मागेत रांगेत उभं न राहत सरळ पुढे घुसल, “आधी मला पेट्रोल भरू दे” अशी दादागिरी केली. त्यावर त्या तरूणाने आक्षेप दर्शवला आणि त्यांना पुढे घुसू देण्यास नकार दिला.
मात्र यामुळे ते दोन तरूण संतापले आणि त्यांनी गोंधळ माजवत त्या तरूणाची थेट कॉलरच पकडली आणि त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये नितेश गुप्ता हा तरूण जबर जखमी झाला आहे. मारहाण करून, दहशत माजवून ते तरूण तेथून निघून गेले. ही संपूर्ण घटना त्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.