अंगणात खेळणाऱ्या दोघा भावंडांचे अपहरण नाही, समोर आली धक्कादायक बाब, एक भाऊ अद्यापही बेपत्ता

| Updated on: Feb 18, 2023 | 3:50 PM

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोन मुलांचं अपहरण झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या अपहरणामागील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अंगणात खेळणाऱ्या दोघा भावंडांचे अपहरण नाही, समोर आली धक्कादायक बाब, एक भाऊ अद्यापही बेपत्ता
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : तीन दिवसांपूर्वी नाशिक सिन्नर ( Nashik Sinnar) येथील कानडी मळ्यातील दोन मुलांचं घरासमोर खेळत असतांना अपहरण (Missing)  झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ही दोन्ही मुलं भावंडे असल्याचे समोर आले होते. मुलांची आई कामावरून घरी आल्यावर आईने मुलांचा शोध घेतल्यानंतर मुलांचा शोध लागत नसल्याने आईने धावाधाव सुरू केली होती. त्यानंतर संपूर्ण कुटुंब मुलांचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मुलं रात्री उशिरा पर्यन्त न मिळाल्याने गुंजाळ कुटुंबाने सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीसांनी अपहारणाचा गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही भावंडांचा शोध सुरू झाला होता. पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली होती. मात्र, त्यामध्ये दोन्ही भावंडचा शोध लागत नव्हता. मात्र दोन दिवसांनी त्यातील एक मुलगा रोहण गुंजाळ हा सापडला आहे.

तर दूसरा 11 वर्षांचा मुलगा आकाश हा अद्यापही सापडला नाहीये. रोहण घरी परतल्यानंतर त्यांचं अपहरण झालेले नव्हते असं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र यातील आकाश हा पळून गेल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही भावंडे आई रागवेल या भीतीने पळून गेल्याचे समोर आले आहे. दोन्ही मुलांची आई सरला गुंजाळ या वीट भट्टीवर काम करतात. त्या घरी परत आल्यावर मुलांना रागवत असत. आणि त्याचमुळे ही मुलं पळून गेली होती.

रोहण आणि आकाश हे दोन्ही भावंडे सहावीत शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलं शाळेत न गेल्याने आईने त्यांना विचारले होते. त्यावेळी मुलं पळून गेली. आई घरी गेल्यावर मारेल म्हणून ही दोन्ही पळून गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

त्यानंतर ही दोन्ही मुलं एका ठिकाणी खेळत असल्याचे समोर आले आहे. नातेवाइकांनी बघताच एक मुलगा तेथून पळून गेला. आई मारेल या भीतीने तो अजूनही घरी परतला नाहीये. तर दूसरा रोहण नावाचा मुलगा घरी आहे.

जवळच एका ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे पाहून त्यांनी तिथे सहारा घेतला होता. नंतर ही मुलं आजूबाजूच्या नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी एकाला पकडले मात्र दूसरा अजूनही फरारच आहे. त्याचा शोध आता पोलीसांनी सुरू केला आहे.

सिन्नर तालुक्यातील या घटनेने परिसरातील पालकांचीही चिंता वाढली आहे. 11-12 वर्षाची मुले पळून जाऊ लागल्याने चिंतेचं कारण बनलंय.