2 वर्षांच्या मुलीला भरधाव टेम्पोने चिरडलं, विरारमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू

| Updated on: Oct 08, 2024 | 8:26 AM

विरारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका दुधाच्या पिकअप टेम्पोने चिमुकल्या मुलीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

2 वर्षांच्या मुलीला भरधाव टेम्पोने चिरडलं, विरारमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू
Follow us on

मुंबईतील विरार येथे एक भीषण अपघात झाल्याचे समरो आले आहे. एका पिकअप टेम्पोने अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. – विरार पश्चिमेकडील डोंगरपाडा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आमुळे चिमुकल्या मुलींच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा परिसरात हा भीषण अपघात घडला. आत्माराम पार्क परिसराजवळील एका घरात सिंग कुटुंब राहतं. त्यांची दोन वर्षांची मुलगी मृत्यूमुखी पडली. विरार पश्चिम आत्माराम पार्क परिसरातील इमारतीच्या गेट जवळ दुधाचा पिक टेम्पो हा गाडी रिव्हर्स घेत होता. मात्र तेवढ्यात त्या गाडीची दोन वर्षांच्या चिमुकलीला धडक बसली आणि ती चाकाखाली चिरडली गेली. त्यामध्ये त्या छोट्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या लगानग्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.