गेल्या काही महिन्यांत बारामतीमधील गुन्ह्याच्या घटना प्रचंड वाढल्या असून सहा महिन्यांमध्ये तिसरा खून झाल्याने बारामतीकर अक्षरश: हादरले आहेत. बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षांच्या तरूणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. यामुळे बारामतीमध्ये प्रचंड खळबळ माजली असून शहरात भीतीचे वातावरण आहे. लोकं जीव मुठीत धरून जगत आहेत. सहा महिन्यांपूर्वीदेखील असाच खून करण्यात आला होता. आता सहा महिन्यांच्या आत तिसरी हत्या झाल्याने गावात दहशत पसरली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस असे तरूणाने नाव असून फक्त एका मुलीशी बोलला या कारणावरून थेट त्याचा जीवच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मान, हात, डोळे, नाकावर कोयत्याने वार करण्यात आल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद तक्रार दाखल केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा.प्रगतीनगर ता बारामती जि पुणे), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे), संग्राम खंडाळे अशी आरोपींची नावे आहेत.पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मुलीशी बोलल्याने जीवच घेतला
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा एका मुलीशी बोलत होती, ती आरोपीची मावसबहीण होती. मात्र तो कॉलेज परिसरात बहिणीशी बोलत असल्याचा राग आल्यानेचे आरोपींनी हे कृत्य केलं. आरोपी नंदकिशोर, महेश आणि संग्राम या तिघांनी कॉलेज परिसरातच अनिकेत याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याच्यावर निर्घृण हल्ला केला. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर हा हल्ला झाला. त्यामध्ये अनिकेतची मान, हात, डोळे, नाक याच्यावर सपासप वार करण्यात आले. त्यामुशे तो गंभीर जखमी होऊन, रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. उपचार सुरू असतानाच अनिकेता मृत्यू झाला.
या घटेनंतर अनिकेतचा भाऊ अभिषेक याने बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. नंदकिशोर अंभोरे, महेश खंडाळे आणि संग्राम खंडाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. सहाय्यक निरीक्षक गजानन चेके हे पुढील तपास करत आहेत.