महाठग सुकेश चंद्रशेखर याच्या 26 गाड्यांचा लिलाव होणार, दिल्ली कोर्टाने दिली ईडीला परवानगी

| Updated on: Feb 15, 2023 | 9:33 AM

या वाहनांची देखभाल करण्यात सरकारचा बराचसा पैसा वाया जात आहे. सरकारच्या तिजोरीवर या वाहनांच्या देखभालीचा भार पडत आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखर याच्या 26 गाड्यांचा लिलाव होणार, दिल्ली कोर्टाने दिली ईडीला परवानगी
CONMAN SUKESH
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : महागडी गिफ्ट देऊन बॉलिवूडच्या (  BOLLYWOOD ) अनेक हिरोईनना फसविणाऱ्या ठकसेन सुकेश चंद्रशेखर याला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 26 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्याचा आदेश दिल्ली कोर्टाने (delhi ) अमलबजावणी संचनालयाला ( ईडी ) दिला आहे. या महागड्या गाड्या सुकेशची पत्नी लीना मारीया हीच्या नावाने रजिस्टर असल्याचे उघडकीस आले आहे. या वाहनांना तपास यंत्रणांनी यापूर्वीच जप्त केले आहे. सुकेश चंद्रशेखर याच्यावर अमलबजावणी संचलनालयाने ( ED) गुन्हा दाखल केला असून त्याने ज्या बॉलीवूड हस्तींना महागडी गिफ्ट दिली आहेत. त्यांचीही चौकशी सुरू आहे.

दिल्ली पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाला सांगितले की अमलबजावणी शाखेने सुकेशच्या सर्व गाड्यांची कस्टडी घेतली आहे. या गाड्यांना अमलबजावणी संचनालयाने भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करताना जप्त केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे या गाड्यांच्या लिलावात सहभाग घेण्याची परवानगी मागितली होती. ईडीने कोर्टाला सांगितले की, ही वाहने तपासा दरम्यान जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने बेकायदेशीर तसेत नियमबाह्य आहेत. या वाहनांची देखभाल करण्यात सरकारचा बराचसा पैसा वाया जात आहे. सरकारच्या तिजोरीवर या वाहनांच्या देखभालीचा भार पडत आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी कोर्टात वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ईडीला या वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी दिली. कोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही लिलावात सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे.

 जॅकलीनला वेलेंटाईन डेच्या दिल्या शुभेच्छा…

दिल्ली कोर्टाने आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्या गाड्यांचा लिलावासंबंधी अहवाल कोर्टाला सादर करण्यास सांगितले आहे. कोर्टाने सुकेशच्या सर्व वाहनांची एक लिस्ट त्यांचे रजिस्ट्रेशन क्र.इंजिन क्रमांक, आणि वाहनांच्या फोटोसह तयार करण्यासही सांगितले आहे. सुकेशला कोर्टात हजर केले तेव्हा त्याला ईडीचे अधिकारी कोर्टात घेऊन जात असताना बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडीस हिला वेलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केजरीवाल यांच्यावरील आरोप …

त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप योग्यच असल्याचे म्हटले आहे. आपण केंद्रीय तपास यंत्रणा केव्हा या आरोपाची दखल घेतात याची वाट पहात असल्याचे त्याने सांगितले. आर्थिक गु्न्हे शाखा आणि ईडी दोन्ही यंत्रणा सुकेश चंद्रशेखर याच्यावरील घोटाळ्याच्या आरोपांची चौकली करीत आहेत. सुकेशने फोर्टीस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांची पत्नी आदिती सिंह हिची दोनशे कोटींची फसवणूक केली आहे.