लातूर : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा (thieves gang) लातूर पोलिसांनी (Latur Police) पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 53 लाखांच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . विशेष म्हणजे या टोळीतील काही आरोपींवर मोक्का अंतर्गत यापूर्वीच कारवाई करण्यात आलेली आहे . लातूर (Latur) , औरंगाबाद , बीड, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांसह राज्यातल्या विविध भागात सराईतपणे घरफोडी करीत सात जणांच्या या टोळीने लाखोंचे दागिने लुटल्याचे समोर आले आहे . भाड्याची कार घ्यायची आणि राज्यातल्या कोणत्याही शहरात जाऊन तिथे घरफोड्या करायच्या अशी या टोळीची पद्धत होती. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने या टोळीतील प्रमुख चार आरोपीना अटक केली आहे . या आरोपींमधील चारही जणांवर राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती लातूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे.
या टोळीने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. आरोपींनी लातूर , औरंगाबाद , बीड, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. चोरी आणि घरफोडीच्या तक्रारी वाढत असल्याने चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर यामध्ये पोलिसांना यश आलं आहे. लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील सात जणांपैकी चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती लातूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे. सध्या या आरोपींची चौकशी सुरू असून, या टोळीत सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत चोर होते. ते चोरीसाठी भाड्याच्या गाडीचा वापर करत असत. ज्या ठिकाणी चोरी, घरफोडी करायची आहे तिथे ते भाड्याच्या गाडीने जात असत. त्यांनी अशा अशाप्रकारे लातूर , औरंगाबाद , बीड, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी केली होती. अखेर यापैकी चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.