गुजरातमध्ये कोस्ट गार्डची मोठी कारवाई, ईराणी बोटीतून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे हेरॉईन जप्त

| Updated on: Mar 07, 2023 | 3:45 PM

गुजरातमधील ओखा समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक दलाने कारवाई करत तब्बल 425 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये कोस्ट गार्डची मोठी कारवाई, ईराणी बोटीतून तब्बल इतक्या कोटींचे हेरॉईन जप्त
एनसीबीकडून एमडी ड्रग जप्त
Follow us on

अमहदाबाद : गुजरातमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचा गोरखधंदा जोरात सुरूच आहे. समुद्र मार्गे अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने तस्करी केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. ओखा किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईमध्ये इराणी बोटीतून तब्बल 425 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हा साठा छुप्या पद्धतीने भारतात आणला गेला होता. या तस्करीमागे सूत्रधार कोण हे अद्याप उघड झालेले नाही, मात्र तटरक्षक दलाने हेरॉईन आणणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. ओखा किनारपट्टीपासून जवळपास 340 किलोमीटर अंतरावरील समुद्रामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे इराणी नागरिक असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.

गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई

अलीकडच्या काळात गुजरात ड्रग्ज तस्करीच्या गैरकृत्यामुळे चर्चेत आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी गुजरात समुद्र किनारपट्टी भागात विशेष दक्षता बाळगून कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतरही ड्रग्ज तस्करांना चाप बसला नसल्याचे ओखा किनारपट्टीजवळ करण्यात आलेल्या कारवाईतून उघड झाले आहे.

दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने हेरॉईन जप्तीची मोठी कारवाई केली आहे. इराणी बोटीतील पाच जणांकडून 61 किलोग्राम हेरॉईनचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत 425 कोटी रुपये आहे. भारतीय तटरक्षक दलाने गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ओखा किनारपट्टी जवळील समुद्रात आयसीजीएस मीरा बहन आणि आयसीजीएस अभीक ही दोन गस्ती जहाजे तैनात केली होती.

हे सुद्धा वाचा

तटरक्षक दलाने पाठलाग करुन बोटीला पकडले

या जहाजांच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास गस्त घातली जात होती. त्यावेळी एक संशयास्पद नौका दिसली संबंधित नौका थांबवण्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलाकडून देण्यात आला. मात्र इराणी बोटीतील क्रू मेंबर्सने बोट न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. भारतीय तटरक्षक दलाच्या बोटींनी त्या बोटीचा पाठलाग सुरू केला. थोड्याच अंतरावर बोटीला भारतीय तटरक्षक दलाच्या बोटींनी घेरले आणि आतील सामानाची झडती घेण्यात आली. यावेळी बोटीमध्ये तब्बल 425 कोटी रुपयांचा हेरॉईन साठा सापडला.