चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शेत मजुरां (Laborers)ना घेऊन चाललेला पिकअप वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या अपघाता (Accident)त 43 मजूर जखमी (Injured) झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाडा मार्गावर आज घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 19 शेतमजूर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शेतमजूर केवाडा गावातील असून गोंदेडा-बाडा मार्गावरील शेतात शेतमजुरी करण्यासाठी चालले होते.
जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. मजुरांची कमतरता असल्याने पिकअप, ऑटोने मजुरांना शेतात नेले जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजूर गोंदेडा-बाडा मार्गावरील शेताकडे घेऊन जात असताना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजूर धावून गेले. वाहनात दबलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे.
नगर-कल्याण महामार्गावर राजुरी (जुन्नर) शिवारात बस व इको कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात इको कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुलशन शकील चौगुले (48) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (43 farm laborers injured in pickup tempo accident in Chandrapur)