चोर पाप धुवायला देवाकडे गेले, त्या आधी धू धू धुतलं ते पोलिसांनी, चोर संन्याशी व्हायचा प्रयत्न करतात तेव्हा..

| Updated on: Apr 20, 2023 | 5:43 PM

गुन्हेगार कितीही चलाख आणि हुशार असला तरी तो पोलिसांना खूप दिवस चकवा देऊ शकत नाही. प्रत्येक गुन्हेगाराला वाटतं की मी पकडला जाणार नाही, माझी चोरी मी केलेला गुन्हा कधी समोर येणार नाही, असा त्याला विश्वास असतो. मात्र

चोर पाप धुवायला देवाकडे गेले, त्या आधी धू धू धुतलं ते पोलिसांनी, चोर संन्याशी व्हायचा प्रयत्न करतात तेव्हा..
Follow us on

Crime News | चोर कितीही चलाख आणि हुशार असला तरी तो पोलिसांना खूप दिवस चकवा देऊ शकत नाही. प्रत्येक चोर, आरोपी आणि गुन्हेगार मी पकडला जाणार नाही, माझी चोरी मी केलेला गुन्हा कधी समोर येणार नाही, असा त्याला विश्वास असतो. मात्र हे गुन्हेगार, आरोपी कितीही सराईत असले तरीही एखादी चूक करतातच जी त्यांना नंतर गोत्यात आणते आणि सर्व प्रकरणाचा छडा लावण्यात मोठी भूमिका पार पाडते.

त्याचं झालं असं की 12 एप्रिल रोजी रात्री सराफा व्यापाऱ्याकडून तब्बल 43 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री चकमकीत दोघांना गोळी लागली. या गोळीबारात दोघांना पकडण्यात यश आलं. तर बाकीच्या दोघांनी पोलिसांना चकवा देत तिथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली. सराफाला लुटल्यांनतर आम्ही पापाचं प्रायश्चित करण्यासाठी वैष्णोदेवीला निघाल्याचं दोघांपैकी एकाने पोलिसांना सांगितलं.

आम्ही बरीच रक्कम गरिबांमध्ये वाटली, ज्यामुळे आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. तसेच केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माफ व्हावी म्हणून गोरगरिबांमध्ये ती रक्कम वाटली. मात्र झाशीला परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना धरलंच. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळतेच, असं म्हणत ते दोघे पोलिसांसमोर माफी मागत गयावया करु लागले. हा सर्व प्रकार झाशीमधील सिमरावारी गावातील आहे.

लाखो रुपयांची उधळपट्टी

“या सर्व प्रकरणात आम्ही अठौदना गावातील ओम बाबू यादव उर्फ गट्टा आणि नगरा येथील आजादपुरामधील गिरवर राजपूत यांना अटक केली आहे. तर दोघे अजूनही फरार आहेत. लूटीनंतर चौघेही वैष्णोदेवीला निघून गेले. तिथे या चौघांनी सव्वा लाख रुपयांची उधळपट्टी केली. तर गरिबांमध्ये पैसेही वाटले”, अशी माहिती पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

“आरोपी 4 दिवसांनी झाशीत परतले. अटक करण्यात आलेल्यांकडून 12 लाख 90 हजार रुपये इतकं बाजार मूल्य असलेलं 210 ग्रॅम सोनं, 24 हजार रुपयांची रोकड, सर्व प्रकरणातील बाईक, 2 बंदूका आणि 9 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत”, असंही पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं.

ओम बाबू हा सराईत गुन्हेगार आहे. ओम बाबू विरुद्ध फसवणूक, लूटमार, अपहरण, दरोडा आणि यासारख्या विविध कलमान्वये 5 गुन्हे दाखल आहेत. तर गिरवर राजपूत याच्यावर हत्या, लूटमारीसह अन्य कलमान्वये 5 गुन्ह्यांची नोंद आहे. दोघांची गेल्या 4 महिन्यांआधी जामिनावर सुटका झाली होती. मात्र आता पोलीस या दोघांना जामीन रद्द करणार आहे.

नक्की प्रकरण काय?

सिमरावारी इथे शिव गणेश कॉलनीत राहणारे मुन्नालाल सोनी यांचं श्रीरामराजा ज्वेलर्स या नावाचं दुकान आहे. मुन्नालाल हे 12 एप्रिल रोजी दुकान बंद करुन बाईकवरुन घरच्या दिशेने निघाले. यावेळेस मुन्नालाल यांनी सोबत जवळपास 750 ग्रॅम सोनं आणि 3 लाख 50 हजारांची रोकड होती. मुन्नालाल यांच्या मागे 2 बाईकवरुन 4 जण आले. मुन्नालाल याच्यासमोर बाईक आडवी घातली. मुन्नालाल याच्या डोक्यावर बंदूक रोखली आणि रक्कम आणि सोनं घेऊन तिथून धूम ठोकली.

पोलिसांनी असं धरलं

“आम्ही या चौघांची ओळख पटवून शोधमोहिम सुरु केली होती. वैष्णोदेवीवरुन परतताना मंगळवारी रात्री आम्हाला आमच्या सूत्रांनी माहिती दिली की हे चोघे खजराहा नहर या मार्गाने निघणार आहेत. खैलार इथून खजराहच्या दिशने जाणाऱ्या कालव्यावर भेल रेल्वे क्रॉसिंगजवळ तपासणी सुरु होती” अशी माहिती पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

“बैदोरा इथून आलेल्या या चौघांनी आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या चौघांनी थांबण्याऐवजी पोलिसांवरच गोळीबार केला. त्यानंतर आम्हीही गोळीबार केला. यामध्ये ओम बाबू यादव आणि गिरवर राजपूत या दोघांना गोळी लागली, त्यामुळे या दोघांना पकडण्यात यश आलं. तर दोघे पळून गेले. दरम्यान या प्रकरणात सविस्तर तपास आहोत”, असंही पोलीस अधीक्षक म्हणाले.