गुजरात : गुजरातच्या (gujrat) वडोदरा (vadodara) शहरात एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. पड़रा रोडवरती हा अपघात झाला आहे. रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. एक गंभीर जखमी असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी मोठ्या ओरडण्याचे आवाज येत असल्यामुळे परिसरातल्या लोकांची तिथं गर्दी झाली होती. भयानक अपघात पाहिल्यानंतर पाहणारी लोकं सुध्दा भयभीत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. झालेल्या दुर्देवी अपघातामध्ये जागीच तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलांना गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन मुलांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाच लोकांना जवळच्या एसएसजी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले आहेत.
वड़ोदरामधून नायक परिवार सोखड़ा येथे लग्नासाठी गेले होते. तिथून परत येत असताना अपघात झाला आहे. 28 वर्षीय अरविंद पूनम नायक, 25 वर्षीय काजल अरविंद नायक, 12 वर्षीय शिवानी अल्पेश नायक 5 वर्षीय गणेश अरविंद नायक आणि 10 वर्षीय दृष्टि अरविंद नायक इत्यादी लोकांचा समावेश आहे.
Gujarat | Five members of a family including two children died in a car accident after their car hit another vehicle in Vadodara district on the night of February 24: ACP, Traffic, Vadodara (24.02) pic.twitter.com/3TLBWayP7f
— ANI (@ANI) February 25, 2023
या प्रकरणात वड़ोदरा येथील सहायक पोलिस आयुक्त प्रणव कटारिया यांनी सांगितले की, एक एर्टिगा कार रिक्षात घुसली. त्यामध्ये सहाजण प्रवास करीत होते. तीन लोकांचा जागीचं मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सहा वर्षीय आर्यनचा उपचार सुरु असल्याची माहिती दिली.
एर्टिगा कारच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या कार चालकाचं नाव जयहिंद यादव असं आहे. त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याची अधिक चौकशी करण्यात येणार आहे.