पुन्हा व्यवहारात आढळल्या बनावट नोटा, भाजी विक्रेत्यांना कुणी दिल्या नोटा ?

| Updated on: Nov 07, 2022 | 5:44 PM

झेरॉक्समध्ये जाऊन पाचशे रुपयांच्या नोटेची प्रिंट काढून एकमेकांना चिपकवून रात्रीच्या वेळेचा फायदा घेत भाजी विक्रेताला दिल्याची घटना समोर आली आहे.

पुन्हा व्यवहारात आढळल्या बनावट नोटा, भाजी विक्रेत्यांना कुणी दिल्या नोटा ?
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील सिडको भागात बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिडको येथील परिसरातील असलेले उपेंद्रनगर भाजी मार्केट येथे ही घटना घडली आहे. लाल रंगाचे स्वेटर परिधान केलेल्या एकाने पाचशे रुपयांची नकली नोटा बाजारात दिल्याची बाब उघडकीस आली आहे. 20 ते 30 रुपयांची भाजी खरेदी करत पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन उर्वरित पैसे परत घेतलेल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे खरेदी केलेला भाजीपाला पुढे जाऊन कानाकोपऱ्यात जाऊन फेकून देत पसार झाल्याचे समोर आले आहे. सिडकोच्या उपेंद्रनगर येथील भाजीपाला विक्रेते सोनू जाधव या विक्रेत्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आल्याने भाजी मार्केटमध्ये खळबळ उडाली असून अनेक विक्रेत्यांनी याचा धसका घेतला आहे. आपलीही फसवणूक तर कुणी केली नाही ना ? अशी शंका उपस्थित करत अनेकांनी पैशाची तपासणी केली आहे. याशिवाय जाधव यांची फसवणूक झाल्यानंतर परिसरातील अनेक दुकानदार आणि व्यापऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.

नाशिकच्या सिडकोमध्ये पुन्हा एकदा बनावट नोटा आढळून आल्या असून भाजी मार्केटमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

झेरॉक्समध्ये जाऊन पाचशे रुपयांच्या नोटेची प्रिंट काढून एकमेकांना चिपकवून रात्रीच्या वेळेचा फायदा घेत भाजी विक्रेताला दिल्याची घटना समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

यामध्ये बनावट नोट दिल्यानंतर फक्त 20 ते 30 रुपयांची भाजी खरेदी केली होती, त्यात खरेदी केल्यानंतर उर्वरित पैसे घेतल्यानंतर लागलीच धूम ठोकत संबंधित व्यक्ती पसार झाला आहे.

भाजी विक्रेताअ जाधव यांनी नोट निरखून बघितल्यावर नोट सध्या कागदावर कलर झेरॉक्स असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तिचा शोध घेतला असता तो तेथून फरार झालेला होता.

जाधव यांनी ही बाब परिचित लोकांना तात्काळ कळवत असा व्यक्ति निदर्शनास आल्यास त्यास पोलिसांच्या स्वाधीन करावे असे आवाहनही केले.