बिहार : बिहार (bihar) राज्यातील एका आदिवाशी महिलेवरती सहा जणांनी अत्याचार केल्याचं एक प्रकरण पोलिस (bihar police) स्टेशनमध्ये दाखल झालं आहे. ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या सहापैकी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण बिहार राज्यातील आहे, बिहार राज्यातील मुंगेर येथील आदिवासी महिला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी सुध्दा त्या महिलेवरती आरोप केले आहेत. हा गुंता सोडवताना पोलिसांनी (bihar crime news) दमछाक झाली एवढं मात्र नक्की आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सागर हंसदा, हट्टू हंसदा, शिवा टुड्डू, मुकेश हंसदा आणि बट्टू उर्फ सूरज कुमार अशी त्यांची नावं आहेत. सगळ्या आरोपींची लग्न झालेली आहेत. त्याचबरोबर पीडित महिलेंच सुध्दा लग्न झालेलं आहे. त्या पीडित महिलेचा पती नोकरी निमित्त बाहेरगावी आहे. पीडित महिला गावात आपले सासरे आणि मुलगी सोबत राहत आहे.
महिलेचं लग्न झालेलं असताना सुध्दा महिला दुसऱ्या तरुणांसोबत गावाच्या बाहेर येते जाते. त्यामुळं त्यांच्या गावाची बदनामी होत आहे. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की, बाहेर जात आहेस, तर तिकडेचं राहा. इकडं कशाला परत येतेस असा आरोप केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली. त्यामध्ये त्याने सांगितलं, दुसऱ्या लोकांनासोबत तुझे संबंध आहेत. आमच्यासोबत सुध्दा संबंध ठेव, ती महिला हे सगळं करायला तयार झाली नाही, मग सगळ्यांनी बलात्कार केला.
गावातल्या काही लोकांनी सांगितलं की, ती महिला २० दिवसांपूर्वी तिच्या भाच्यासोबत जयपूरला निघून गेली होती. ती महिला गावात परतल्यानंतर गावातल्या काही लोकांनी त्या महिलेला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी गावातली बदनामी होत असल्याचं सांगितलं.
ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले सहा आरोपी त्या महिलेच्या घरी गेले, त्यावेळी त्या महिलेला सांगितलं की, बैठकीला बोलावलं आहे. ती महिला त्यांच्यासोबत निघून गेली, त्यावेळी तिथल्या डोंगराच्या खाली सोबत असलेल्या लोकांनी त्या महिलेवरती बलात्कार केला. त्यानंतर ती महिला कशीबशी तिच्या घरी पोहोचली, त्यानंतर या घटनेची माहिती सासरे आणि गावातल्या लोकांना दिली.