अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला, नाशिक पोलिसांचा सापळा ठरला यशस्वी

| Updated on: Nov 03, 2022 | 7:08 PM

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबबात केलेल्या सुचनेनुसार तपास करत असतांना पोलीस कर्मचारी विशाल देवरे यांना याबाबत माहिती मिळाली होती.

अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला, नाशिक पोलिसांचा सापळा ठरला यशस्वी
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातून गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 61 किलो गांजाची तस्करी करतांना नाशिक पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघा तस्करांना नाशिक पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. सापळा रचून रचत नाशिक पोलीसांनी अमली पदार्थांची होणारी वाहतुक अडवत मोठी तस्करी हाणून पाडली आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून 14 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्यानंतर दोघा संशयित आणि मुद्देमाल आडगाव पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

नाशिक शहर पोलीसांनी अमली पदार्थ तस्करी संदर्भात विविध घटकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबबात केलेल्या सुचनेनुसार तपास करत असतांना पोलीस कर्मचारी विशाल देवरे यांना याबाबत माहिती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

याचवेळी देवरे यांच्या गोपनीय माहितीनुसार आडगाव शिवारातील जकात नाक्यावर गांजा विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती होती.

त्यानुसार आडगाव पोलीस थणेच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या क्रमांक 1 च्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती.
त्याच दरम्यान एका कारमधून दुसऱ्या कारमध्ये गांजा ठेवण्याचे काम सुरू असतांनाच नाशिक पोलीसांच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडत ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये राशीद मन्सुरी आणि प्रितीष जाधव या दोघा तस्करांना बेड्या ठोकल्या असून 61 किलो गाजा जप्त केला आहे.

याशिवाय दोन कार आणि दोन मोबाईल फोन एकुण 14 लाख 53 हजार 680 रूपयांचा माल हस्तगत केला गेला आहे.

दरम्यान या कारवाईचे स्वागत होत असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात इतर अमली पदार्थांच्या तस्करी सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.