Nashik Crime : 62 वर्षीय आजी चालत होती… तो आला आणि झटापट करत पर्स घेऊन पळून गेला…

| Updated on: Sep 24, 2022 | 2:18 PM

भर दिवसा घडलेल्या या घटनेत चोर हा पाठीमागून येऊन त्याने महिलेच्या पर्सला जोरात ओढण्याचा सुरुवातील प्रयत्न केला, महिलेने पर्स आपल्याकडेच ओढून धरली होती.

Nashik Crime : 62 वर्षीय आजी चालत होती... तो आला आणि झटापट करत पर्स घेऊन पळून गेला...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील जेष्ठ नागरिकांची (Senior Citizen) सुरक्षा पुन्हा एकदा ऐरवणीवर आली आहे. नाशिकच्या पंचवटी (Nashik Panchwati) परिसरातील मखमलाबाद रोडवर एका चोरट्यांनी 62 वर्षीय महिलेला लक्ष केले आहे. 62 वर्षीय महिला मंगला सावंत या रस्त्याने जात असतांना त्यांच्या गळ्यात पर्स होती हीच पर्स पाठीमागून येत एका चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकच्या पंचवटी पोलीसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

नाशिकमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात घरफोडी, अपहरन, सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतांना आता वृद्ध व्यक्तींना चोरट्यांनी लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरातील मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या 62 वर्षीय मंगला सावंत या रस्त्याने जात होत्या, त्याच दरम्यान चोराने त्यांचा पाठलाग केला.

भर दिवसा घडलेल्या या घटनेत चोर हा पाठीमागून येऊन त्याने महिलेच्या पर्सला जोरात ओढण्याचा सुरुवातील प्रयत्न केला, महिलेने पर्स आपल्याकडेच ओढून धरली होती.

मात्र, नंतर चोराने जोराचा हिसका देत पर्स ओढून पोबारा करण्यात यशस्वी झाला, पर्समध्ये मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

नाशिकमध्ये भर दिवसा ही घटना घडल्याने चोरांना पोलिसांचे भय राहिले नाही का ? असा सवाल उपस्थित केला जात असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही पोलीसांनी प्राप्त केले असून चोराच्या मागावर पंचवटी पोलिसांचे पथक आहे. त्यामुळे पोलीसांच्या कारवाईकडे सर्वांचच लक्ष लागून आहे.