दिल्ली : बँकॉकला जाणार्या एका भारतीय प्रवाशाला दिल्ली ( DELHI ) विमानतळावर सीआयएसएफच्या ( CISF ) अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीच्या विमानतळावर रविवारी पकडले आहे. या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल 64 लाख रूपये किंमतीचे विविध देशांचे परकीय चलनाच्या नोटा सापडल्या आहेत. त्याने या नोटा लपविण्यासाठी ट्रॉली बॅगेच्या हॅण्डल पाईपचा वापर केला होता. परंतू लपवलेल्या या नोटा अधिकाऱ्यानी कशा पकडल्या पाहा..
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल तीनवर रविवारी एका प्रवाशाची सिक्युरीटी चेकींग सुरू असताना सुरक्षा अधिकारी चक्रावले. कारण त्याने विविध देशांच्या करन्सी नोटा मोठ्या खूबीने एका मोठ्या ट्रॉली बॅगेच्या हँडलमध्ये लपवल्या होत्या. विमानतळावर ज्यावेळा एका बँकॉकला जाणार्या भारतीय प्रवाशाची तपासणी सुरू असताना त्याच्या ट्ऱॉली बॅगेच्या हॅण्डल पाईपमध्ये नोटा लपवल्याचे स्कॅनर मशिनमध्ये आढळले. हा प्रवासी थाय एअरलाईनच्या फ्लाईटने बँकॉकला जाणार होता.
#CISFTHEHONESTFORCE
Vigilant #CISF personnel apprehended a passenger carrying foreign currency (worth approx. Rs 64 lakh) ingeniously concealed in the handles of his trolley bag @ IGI Airport, New Delhi. The Passenger was handed over to Customs.@HMOIndia
@MoCA_GoI pic.twitter.com/oLyHkxAOr2— CISF (@CISFHQrs) January 29, 2023
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल तीनवर या प्रवाशाची तपासणी सुरू असताना सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना त्याच्या बॅगेच्या हॅंडलमध्ये 68,400 किंमतीचे युरो चलन, 5000 न्युझीलंड डॉलर असे एकूण 64 लाख रूपये किंमतीचे चलन आढळले. त्याने स्क्रु ड्रायव्हरच्या सहायाने या बॅगेच्या हँडलमध्ये या नोटा लपवल्या होत्या. या प्रवाशाला नंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात पुढील चौकशी सोपवण्यात आले आहे. एक्स-रे स्कॅनरमध्ये नोटांची प्रतिमा दिसल्यानंतर या प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हँडलमधून नोट काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.