दारु पिऊन (liquor Drinking) जात जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये (Howrah, West Bangal) हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री दारु प्यायलेल्यांपैकी सात जणांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सातही जणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, विषारी दारु प्यायलाने (Poisonous Alcohol ) मृत्यू झाला की त्यांनी बेकायदेशीर दारुचं सेवन केलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय. दारुचं दुकान चालवणाऱ्याला पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूनंतर अटक केली आहे. त्याला पोलिसांच्या हवाले करण्यासाठी स्थानिक बेदम चोप दिलाय. आता या दारु विक्रेत्याची चौकशी केली जातेय. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दारु पिणाऱ्यांनी या घटनेची धास्ती घेतली असून आता पुढील तपास केला जातो आहे. पोलिसांनी त्यासाठी दारुचे नमुनेही फॉरेन्सिक चाचणीसाठी पुढे प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
#HoochTragedy: Six persons found dead under mysterious circumstances in Howrah’s Ghusuri area. Locals claim they died after consuming spurious liquor. Several rushed to the hospital are said to be serious. Police investigation underway. pic.twitter.com/Ucvltzgrzs
हे सुद्धा वाचा— Pooja Mehta (@pooja_news) July 20, 2022
मृत्यू झालेल्या सात जणांच्या बाबतीत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पोस्ट मॉर्टेम रुपोर्टमध्ये दारुमुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Six persons died this morning at Ghusuri in Howrah district of West Bengal after consuming illicit liquor
Several others have been admitted to a local hospital
Police investigation is on .. pic.twitter.com/3kF93Km2F9— Syeda Shabana (@ShabanaANI2) July 20, 2022
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने मात्र दारुवर संशय व्यक्त केला आहे. दारुमध्ये जीवघेणी रसायनं असू शकतात आणि त्याच्या सेवनामुळे तब्बेत बिघडून सात जणांचा मृत्यू झालेला असू शको, अशी शंका घेतली आहे. त्यामुळे पुढील तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी दारुचे बुधवारी नमुने गोळा केलेत. फॉरेन्सिक टीमकडून आता या नमुन्यांचीच चाणी केली जाईल. आता या चाचणीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
रविवारी रात्री सात जणांना दारूचं सेवन केलं होतं. ज्या ठिकाणाहून या सातही जणांनी दारु घेतली होती, त्या दुकानाचीही स्थानिकांनी बुधवारी तोडफोड केली. रविवारी दारु प्यायलेल्या सात जणांवर तीन दिवस उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पश्चिम बंगालच्या हावडा येथील घुसुरी येथे ही खळबळजनक घटना घडली.