ठाणे : मुंबई-नाशिक हायवेवर एका ट्रक (Truck) चालकाचा वाहनावरील ताबा (Control) सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारील झोपडीवर पलटी झाला. यावेळी झोपडीत झोपलेल्या 14 वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा ट्रक पडल्याने यात मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. शुक्रवारी सकाळी 6.14 वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक हायवेवर माजिवडा ब्रिजजवळ ही घटना घडली. मधु भाटी असे अपघातातील मृत मुलीचे नाव असून ती मूळची गुजरात येथील रहिवासी आहे. रस्त्याच्या बाजूला टेडी बिअर, खेळणी विकून ही मुलगी आपला उदरनिर्वाह करत होती आणि तेथेच झोपडी बांधून राहत होती. अपघातानंतर मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
माजिवडा येथे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरती एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी रस्त्याच्या बाजूला वस्ती करून राहत असलेल्या एका झोपडीवर ट्रक पलटी झाला. झोपडीमध्ये झोपलेल्या एका मुलीच्या अंगावर ट्रक पडला. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पळून गेला आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 1 पिकअप वाहन, 1 बाईक ॲम्बुलन्स, कापूरबावडी वाहतूक पोलीस कर्मचारी, कापूरबावडी पोलीस कर्मचारी, 2 क्रेन वाहने, 108 रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या जवानांसह 1 रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली दबलेल्या मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारकरीता नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर मुलीला मयत घोषित केले. (A 14-year-old girl died in the accident when a truck overturned on a hut on the Mumbai-Nashik highway)