विरार : विरारमध्ये (virar) एक दुर्देवी घटना घडली आहे, त्यामध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पोहत असलेल्या मुलांना किनाऱ्यावर पाहत बसलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्या मुलाचं नाव तुषार सचिन उंबाळकर (virar crime news) असं आहे. तो मुलगा १६ वर्षाचा होता. ही घटना काल सायंकाळी चार वाजता घडली आहे. विरार पश्चिमेच्या चिकल डोंगरी तलाव (chikal dongri lake) परिसरात ही घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती. विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विरार मध्ये एका 16 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुषार सचिन उंबाळकर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तुषार आणी त्याचे दोन मित्र पोहण्यासाठी विरार पश्चिमेच्या चिकल डोंगरी तलावावर गेले होते. तुषारला पोहायला येत नव्हते, त्याचे दोन मित्र पाण्यात पोहत असताना तो किनाऱ्यावर बसून बघत असताना त्याचा तोल गेला. तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्या तरुणांना पोहता येत नाही, अशी अनेक तरुणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात पर्यटक अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जातात, त्यावेळी सुध्दा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणांचा मृत्यू झाला आहे. काही तरुण धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यातून वाहून गेले आहेत.