सांगली : लग्न करताना तरुणांनी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत असतानाच आता सांगलीच्या विटामध्ये (Vita, Sangli) एक गंभीर घटना समोर आली आहे. अनेकदा लग्न जमवताना किंवा लग्न करताना अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता सांगलीतल्या विटामधून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विटामध्ये एका तरुणाचं खोटं लग्न लावून देण्यात आलंय. याप्रकरणी तरुणीनं पोलिसात तक्रारही दाखल केली असून अखेर पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाची फसवणूक (Cheating by fake marriage) केल्यानंतर त्याला धमकावण्यातही आलं. या तरुणानं सोने-चांदीसह रोख रक्कमही मुलीकडच्यांना दिली होती. त्यानंतर खोटं लग्न लावून दिल्याचं कळल्यानंतर पैसे मागायला आलास तर तुझ्या बहिणीचा पाय मोडू अशी धमकीही तरुणाला देण्यात आली होती. विटा पोलिस स्थानकात (Vita Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता अधिक तपास करत आहेत.
विटा पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटामध्ये गणेश कुंभार या तरुणानं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 41 वर्षांच्या गणेशनं आपलं खोटं लग्न लावून देऊन आपली फसवणूक झाली असल्याचं तक्रारीत म्हटलंय. वर्षा बजरंग जाधव, हिंदुराव पवार, स्वाती, सरीता पवार, दशरथ शिंदे असं फसवणूक करणाऱ्यांची नावं आहेत, असा आरोप गणेश यांनी केला आहे.
28 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वर्षा जाधव यांच्या सुलतानगादे येथे घरी करण्यात आली. वरील पाचजणांनी संगनमताने माझ्याकडून पैसे व दागिने घेऊन स्वाती हिच्याशी माझे खोटे लग्न लावून देऊन फसवणूक केली असून वर्षा जाधव हिने आमच्या घरी चौकशीला आल्यास कुंभार यांच्या बहिणीला पाय मोडेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादी गणेश कुंभार यांनी तक्रारीत म्हटले आहे. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेमुळे विटासह खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके याप्रकरणी आता अधिक चौकशी करत आहेत.
महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा
सांगलीत अनोखी चोरी, सोनसाखळीसोबत शेळ्या-बोकडही चोरले, तरुणाला बेड्या