Pandharpur Child Death : पेपर लिहिता लिहिता चिमुकली कोसळली ती पुन्हा उठलीच नाही, काय घडले नेमके?

| Updated on: Jan 19, 2023 | 7:32 PM

गेल्या चार दिवसांपासून अनन्या ही तापाने आजारी होती. मात्र कालपासून तिला थोडे बरे वाटत होते. तसेच आज परीक्षा असल्याने ती शाळेत गेली होती. मात्र पेपर लिहित असतानाच अचानक अनन्या खाली कोसळली.

Pandharpur Child Death : पेपर लिहिता लिहिता चिमुकली कोसळली ती पुन्हा उठलीच नाही, काय घडले नेमके?
पंढरपूरमध्ये शाळेतच परीक्षेदरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: tv9
Follow us on

पंढरपूर : पंढरपूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात पेपर लिहिता लिहिता एका 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. अनन्या भादुले असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. आज गुरुवारी सकाळी 11 वाजता अनन्या शाळेत गेली. परीक्षेचा पेपर लिहिताना तिला झटका आला असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांनी तातडीने तिला दवाखान्यात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यूने तिला गाठले. अनन्याच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अनन्या दोन दिवसापासून आजारी असल्याची माहिती कळते.

गेल्या चार दिवसापासून आजारी होती

गेल्या चार दिवसांपासून अनन्या ही तापाने आजारी होती. मात्र कालपासून तिला थोडे बरे वाटत होते. तसेच आज परीक्षा असल्याने ती शाळेत गेली होती. मात्र पेपर लिहित असतानाच अचानक अनन्या खाली कोसळली.

हे सुद्धा वाचा

ब्रेनहॅमरेजमुळे मुलीचा मृत्यू

शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ब्रेन हॅमरेजमुळे अनन्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या अशा अचानक जाण्याने भादुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वसईत जिम करताना वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू

जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना वसईत आज सकाळी घडली. प्रल्हाद निकम असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आनंदर नगर परिसरात सेरोजो 11 जिममध्ये निकम हे सकाळी जिम करत असतानाच अचानक खाली कोसळले.

निकम यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. जिम करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.