सूरत : गुजरातमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यावसायिकाने पत्नीसह 15 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना सूरजमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकून दिला. दुहेरी हत्या झाल्या तेव्हा मोठी मुलगीही घरातच होती. दीव, दमण आणि दादरा या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश मेहता असे अटक आरोपीचे नाव आहे. मेहताने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही हत्यांची अचूक माहिती आरोपी देत नाही.
वडील आईला मारहाण करत होते.यावेळी 15 वर्षाची मुलगी आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली. यामुळे संतपालेला आरोपी योगेश मेहता याने आपल्या मुलीचीही हत्या केली. मेहताने दोन्ही महिलांना मारण्यासाठी हातोड्याचा वापर केला आणि नंतर चाकूने आपल्या मुलीचे तुकडे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी हातोडा जप्त केला असून, चाकूचा शोध सुरू आहे.
पती-पत्नीमध्ये नेहमी वाद आणि भांडण होत असे. यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती आरोपीने दिली. जोडप्याचे 20 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक 18 वर्षाची आणि एक 15 वर्षाची मुलगी होती. यापैकी 15 वर्षाची मुलगी आईला वाचवायला मध्ये पडली म्हणून आरोपीने तिचीही हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या भांडणामुळे या जोडप्याने पोलिसांशी संपर्क साधला होता. घटस्फोटासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली होती, मात्र समुपदेशनानंतर ते दोघे घरी परतले. पोलीस कालव्यात मुलीचा शोध घेत आहेत.