चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरातील ( Saptashrungi Temple ) दानपेटीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणी ( Nashik theft ) अखेर कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल वीस दिवसांनी हे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला ( Nashik crime ) चुना लावला होता. याशिवाय सीसीटीव्ही सारखा कडक पहारा असतांना दानपेटीवर कुणी डल्ला मारला. याशिवाय जळालेल्या अवस्थेत नोटा आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे असले तरी देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारण्यात आला आहे. यामध्ये किती रक्कम व इतर वस्तु गेल्या आहेत याबाबत खात्री नाही. मात्र यामध्ये चोरीची घटना झाली ही धक्कादायक बाब आहे.
जिथे दानपेटी आहे तिथे सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्हीला चुना लावण्यात आला आहे. त्यानंतर चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला आहे. विशेष बाब म्हणजे दानपेटीतील बहुतांश नोटा या जळालेल्या स्थितीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतांना चोरीची घटना घडल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर लाखों रुपये खर्च केले जाता असतांना ही चोरी झाल्याने गडावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वस्त मंडळाकडून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून चौकशी करून चोरी करणारे कोण आहेत हे उघडकीस यायला हवे अशी मागणी केली जात आहे. कळवण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून आहे.
गडावर सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्हीसारखा कडा पहारा असताना दानपेटीवर डल्ला मारल्याने एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देवीच्या मंदिराच्या पहिल्या पायरी पासून गणेश मंदिर, रामटप्पा आणि जिथे दानपेट्या आहेत ते प्रत्येक क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खाली आहे.
एकूणच ही चोरीची घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून तब्बल 20 दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात या चोरीत कुणाचा समावेश आहे ? कुणी ही चोरी केली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.