नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बेलापूर पोलिस ठाण्या (Belapur Police Station)त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक पीडित महिलेसोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यातून या दोघांना 15 वर्षाचा मुलगाही आहे. महिलेने नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता नाईक यांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. (A case has been registered against Navi Mumbai BJP leader Ganesh Naik at Belapur police station)
पीडित महिला ही नेरुळ येथे राहत असून 1993 साली महिलेची आणि गणेश नाईक यांचे संबंध आहेत. गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 29 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचा दावा महिलेने केला आहे. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा देखील आहे. लिव्ह इनमध्ये राहत असताना नाईक घरी आले की आपल्याला नर्स किंवा शाळकरी मुलीचा ड्रेस घालून नाचायला लावायचे. तसे न केल्यास ते आपल्याला मारहाण करायचे, असा खळबळजनक आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित महिलेने आपल्या आरोपात पुढे म्हटले आहे की, आपण नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता त्यांनी आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.
लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी याबाबत पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल दिली होती. महिला आयोगानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणी तात्काळ कारवाई करत 48 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज बोलापूर पोलिस ठाण्यात गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against Navi Mumbai BJP leader Ganesh Naik at Belapur police station)
इतर बातम्या
Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल
PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; ‘आयकर’ची कारवाई