मुंबंई : रविवार 31 जुलै हा दिवस शिवसेना नेते संजय राऊतांसाठी(Sanjay Raut) सर्वात वाईट दिवस ठरला आहे. सकाळी सातच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर ईडीची धाड पडली. यानंतर सायंकाळी ईडीच्या पथकाने संजय राऊतांना ताब्यात घेतले. यानंतर राऊतांच्या घरी 11 लाख 50 हजाराची रोकड सापडली. या नंतर रात्री संजय राऊतां विरोधात वाकोला पोलिस( Vakola police station) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी राऊतांवर ही सर्व कारवाई झाली आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्वप्ना पाटणकर(Swapna Patkar ) यांच्या तक्रारीनंतर संजय राऊतां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार स्वप्ना पाटकणर यांनी केली होती. पाटणकर यांना आलेल्या धमीच्या पत्रात किरीट सोमय्या यांचे देखील नाव होते. यामुळे या धमकी प्रकरणात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार वाकोला पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 509,506,504 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातल्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकीची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबतचं पत्र लिहिले आहे. पाटकर यांना आलेल्या धमकीच्या चिठ्ठीत आपलंही नाव असल्याचं सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सांगीतले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचा ईडीकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. हा जबाब राऊत यांचा विरोधातील असल्याने धमक्या येत असल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. जबाब मागे घेण्यात यावा तसेच तुम्हाला किरीट सोमिया यांनी असे बोलण्यास सांगितले असल्याचा जबाब ईडीला द्या अन्यथा तुमच्यावर बलात्कार करून तुम्हाला जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली असल्याची माहिती पाटकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे. या घोटाळा प्रकरणात जबाब मागे घेण्यासाठी राऊत दबाव आणत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पाटणकर यांच्या धमकीची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश विवेक फणसळकर यांनी वाकोला पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाटकर यांनी त्यांना दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
एक हजार 34 लाखांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राईत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी खरेदीचे व्यवहार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटणकर यांची पत्नी स्वप्ना पाटणकर यांच्या नावाने खरेदी करण्यात आले होते. भूखंडांची किंमत साधारण 60 लाखांच्या आसपास असून स्थानिकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्याचेही आरोप करण्यात आले आहेत .