नाशिक : नाशिक मधील पोलिसांचा ( Nashik Police ) धाक राहिला नाही का ? असा संतप्त सवाल नाशिक मधील महिला ( Women ) वर्गाकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे देवळाली येथील पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत बदनामी केल्याची संतापजनक घटना ताजी असतांना नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ( Mumbai Naka Police ) ठाण्याच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेशी अश्लील वर्तन करून विंनयभंग ( Crime News ) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील रस्तेही सुरक्षित नाही अशी भावना नाशिकच्या महिला वर्गात निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन, पीडित महिला ही घरी पायी जात असतांना संशयित आरोपी हा दुचाकीवरुन पाठीमागच्या बाजूने आला. आणि वाटेल तिथे स्पर्श करू लागला.
महिलेच्या मनास लज्जा निर्माण करणारे हे कृत्य असल्याने मुंबई नाका पोलीसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुण विंनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीचा शोध मुंबई नाका पोलीस करीत आहे.
खरंतर नाशिक शहरात महिला अत्याचाऱ्याच्या घटना समोर आल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या महिलाही सुरक्षित नसल्याची भावना या निमित्ताने निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळाली कॅम्प येथेही पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीसोबत मैत्रीकरून तिचे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पीडित तरुणी घरी जात असतांना रस्टातील टवाळखोरांनी तरुणीची छेड काढली होती. तरुणीने भावाला घरी जाऊन ही बाब सांगितली होती.
त्यांनंतर भावाने बहिणीला सोबत घेऊन जाब विचारण्यासाठी गेलेला असतांना कोयता काढून दोघांवरही वार केले आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी असून कारवाईची मागणी केली आहे.
एकूणच शहरातील वाढती गुन्हेगारीने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये आता पोलिसांची कारवाई महत्वाची ठरणार असून भयमुक्त नाशिक कधी होईल असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.