नशा करताना रोखले, संतापलेल्या तरुणांनी दाम्पत्यासोबत केले असे

| Updated on: Oct 14, 2022 | 9:12 PM

आपल्या घराबाहेर बसून उमदे तरुण कुटुंबीयांना अंधारात ठेवून अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा राग तानाजी यांना आला. त्यांनी तरुणांना ही काय अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का? असे रागाच्या भरात बोलले.

नशा करताना रोखले, संतापलेल्या तरुणांनी दाम्पत्यासोबत केले असे
नशेंडीकडून दाम्पत्याला मारहाण
Image Credit source: tv9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : पहाटेच्या वेळेत घराबाहेर बसून अंमली पदार्थांचे सेवन का करता ? आमचे घर हे अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का ? असा जाब विचारणाऱ्या पश्चिम डोंबिवलीच्या मोठागावमधील एका रहिवाशासह त्याच्या पत्नीला संतापलेल्या नशेडींच्या टोळक्याने (drug addicts) लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याबाबत 5 जणांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस (Vishnu Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या माहितीनुसार, डोंबिवली मोठागाव परिसरात राहणारे तानाजी काटे हे बुधवारी पहाटे उठले असता त्यांना घराबाहेर बोलण्याचा आवाज येत होता. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर त्यांना मोठागावमधील काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असताना दिसले.

काटे यांनी नशा करणाऱ्या तरुणांना हटकले

आपल्या घराबाहेर बसून उमदे तरुण कुटुंबीयांना अंधारात ठेवून अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा राग तानाजी यांना आला. त्यांनी तरुणांना ही काय अंमली पदार्थ सेवन करण्याची जागा आहे का? असे रागाच्या भरात बोलले. त्याचा राग या तरुणांना आला.

हे सुद्धा वाचा

तरुणांकडून दाम्पत्याला बेदम मारहाण

या सगळ्यांनी मिळून लाकडी दांडक्यांनी तानाजी काटे यांना बेदम मारहाण सुरू केली. तानाजी यांनी बचावासाठी ओरडाओरडा सुरू करताच पत्नी पौर्णिमा घराबाहेर आली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून ती मध्ये पडली. तर तरुणांनी तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिचा बोटाला गंभीर दुखापत केली.

यासंबंधी प्रीतम म्हात्रे, प्रवीण भोईर, सोनू भोईर आणि करण वाल्मिकी विरोधात विष्णूचा पोलीस चौकात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण दिसून येत आहेत. पश्चिमेकडील रेतीबंदर, देवीचा पाडा, कुंभारखाण पाडा, गणेशनगर खाडी किनारी रात्रीच्या वेळेत अंमली पदार्थ सेवन करणारे अनेक तरुण गटागटांनी बसलेले असतात.