जळगाव : यावल (YAVAL) तालुक्यातील अट्रावल गावाच्या यावल शिवारातील (SHIVAR) एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किमतीची असलेली केळीची बाग (banana Cultivation) काही माथेफिरुंनी उद्धवस्त केली आहे. साधारण सात झाडांचं नुकसान केल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. हा भयानक प्रकार उजेडात आल्यामुळे अनेकांना धाम फुटला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी आपल्या पीकाची काळजी घेत आहे. शेतकऱ्यांनी अशा विकृती विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.
यावल तालुक्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या केळी पिकांसह अन्य पिकांची नासधूस करण्याच्या विकृत घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा असा प्रकार यावल तालुक्यातील अट्रावल येथील यावल शिवारात उघडकीस आला आहे. राजेन्द्र प्रभाकर चौधरी यांच्या मालकीच्या पावल शिवारातील शेतातील मोठ्या प्रमाणावर केळीची खोड कापून फेकल्या आहेत. राजेन्द्र चौधरी यांच्या शेतातून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे 7000 केळीच्या खोडांची व घडांचे कापून अज्ञात माथेफिरूनी फेकल्या आहेत. याबाबत यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्या अज्ञात माथेफिरूंच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पीकांचं नुकसान केलं जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. परंतु पोलिसांनी आरोपी शोधण्यात अपयश आल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांनी संबंधित टोळीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. अनेक प्रकरणं उजेडात येत असताना सुध्दा पोलिस शांत आहेत अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे.