नाशिक : बाप लेकीचं नातं हे निर्मळ आणि संवेदनशील प्रेमाचे मानले जाते. मात्र याच बाप लेकीच्या नात्याला नाशिकमध्ये काळीमा फसणारी घटना घडली आहे. सख्या मुलीलाच आपल्या वासनेचा बळी एका पित्याने बनविल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल सात वर्षे आपल्या पित्यानेच बादनामीची धमकी देत सलग सात वर्षे अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बापाच्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या वेदना असह्य झाल्याने पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अंबड पोलीसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने अंबड परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. नाशिक डीजीपीनगर परिसरातील ही घटना असून अंबड पोलीसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. अंबड पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.
अंबड परिसरातील डीजीपीनगर परिसरातील एका कुटुंबातील पित्याने आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनविल्याचे समोर आले आहे.
पीडित मुलीची आई, बहीण आणि भाऊ नसतांना पित्यानेच सलग सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरू होते. आपलीच बदनामी होईल म्हणून पीडित मुलीला पित्याकडून धमकी दिली जात होती.
नाशिकच्या अंबड पोलिसांत याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली त्यावरून पित्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घरी कुणीही नसल्याचा फायदा संशयित पित्याने घेतल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. 2016 पासून 2022 पर्यन्त अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
बाप लेकीचे नातं किती पवित्र आणि संवेदनशील असतं, मात्र याच नात्याला नाशिकमध्ये काळीमा फासला गेला असून नराधम पित्याला पोलीसांनी अटक केली आहे.