सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने मित्रानेच मित्राची हत्या (Friend Murder Friend) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये कोळसेवाडीच्या (Kalyan Kolsewadi) भागातील तिसगांव परिसरामध्येउघडकीस आली आहे. विपिन दुबे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Police Arrested Accuse) केली आहे. राजेश्वर पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजेश्वर पांडे आणि विपिन दुबे हे गेल्या पाच वर्षापासून एकमेकांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी राजेश्वरने विपुलला काही पैसे उसने दिले होते. मात्र हे पैसे विपिन परत करत नव्हता. राजेश्वरने पैशासाठी वारंवार विपिनकडे तगादा लावला होता. मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.
राजेश्वरने पैशाची मागणी केली असता नेहमी विपिन उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. याच कारणातून राजेश्वरने विपिनच्या हत्येचा कट रचला.
राजेश्वरने विपिनला आपल्या घरी पार्टी असल्याचे सांगत घरी येण्यास सांगितले. विपिन घरी आल्यानंतर दोघांनी मटण आणि दारुची पार्टी केली. त्यानंतर राजेश्वरने विपिनकडे आपल्या पैशाची मागणी केली.
विपिनने पैसे देत नसल्याचे सांगतल्याने संतापलेल्या राजेश्वरने त्याला संपवले. यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फोन करुन पोलिसांना आपण मित्राची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करत आहेत.