Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये पूजेची चांदीची भांडी चोरणारी टोळी अटकेत

| Updated on: Mar 04, 2022 | 6:04 PM

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी बीड आणि जालना येथून आगामीर खान आणि जमीर शेख या आरोपींना चारचाकीसह अटक केली. या चोरट्यांनी मराठवाडा-विदर्भासह, मध्यप्रदेश-छत्तीसगड येथेही या चोरट्यांनी दरोडे घातल्याचे तपासात उघड झाले आहे.

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये पूजेची चांदीची भांडी चोरणारी टोळी अटकेत
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : पूजेसाठी लागणारी चांदीची साडेतीन लाख रुपयांची भांडी आणि साहित्य चोरणाऱ्या टोळी (Gang)ला पोलिसांनी अटक(Arrest) केली. चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. चंद्रपूर शहरातील विवेकनगर भागातील प्रदीप चेपूरवार यांच्या घरी ही चोरी झाली होती. गजानन महाराज प्रगट दिनासाठी या परिवाराने पूजेसाठी वापरली जाणारी चांदीची भांडी, मूर्ती, ताटे आदी साहित्य बाहेर काढले होते. रात्री उशिरा घरातच काढून ठेवलेल्या साहित्याची घरातील ग्रील काढून घरात घुसून चोरी करण्यात आली होती. (A gang of thieves was arrested in Chandrapur for stealing silver utensils)

घराची ग्रील काढून चोरट्यांनी साहित्य चोरले

घरातली मंडळी सकाळी उठल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ चेपूरवार कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी बीड आणि जालना येथून आगामीर खान आणि जमीर शेख या आरोपींना चारचाकीसह अटक केली. या चोरट्यांनी मराठवाडा-विदर्भासह, मध्यप्रदेश-छत्तीसगड येथेही या चोरट्यांनी दरोडे घातल्याचे तपासात उघड झाले आहे. चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी या घटनेने उजेडात आली आहे.

मुंबईत करोडोंची फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला अटक

सोन्याच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील डझनभर लोकांना फसवून फरार झालेल्या बंटी आणि बबलीला मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. या पती-पत्नीने तक्रारदाराची 35 लाखांची फसवणूक केली आहे. बंटी आणि बबली या दोघांना 2015 मध्ये मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका घोटाळ्यात अटक केली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सध्या बंटी आणि बबली दाम्पत्य तुरुंगात आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखोंचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. (A gang of thieves was arrested in Chandrapur for stealing silver utensils)

इतर बातम्या

Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद

आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत