एकीशी अफेअर, दुसरीशी लग्न; पहिलीला माहिती झाल्यानंतर पोलिसांनी नवरदेवाची काढली वरात

| Updated on: May 18, 2023 | 7:42 AM

चार वर्षापूर्वी पीडित मुलीची एका लग्नादरम्यान भेट झाली. मुलीच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

एकीशी अफेअर, दुसरीशी लग्न; पहिलीला माहिती झाल्यानंतर पोलिसांनी नवरदेवाची काढली वरात
Follow us on

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : काही तरुण मुलींसोबत फ्लर्ट करतात. एखादीला विश्वासात घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करतात. त्यानंतर दुसरीसोबत विवाह करतात. अशावेळी पहिलीची फसवणूक होते. ती पोलिसांत जाते. अशीच एक घटना डोंबीवलीत समोर आली. डोंबीवलीत एकीशी साखरपुडा करून दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. या प्रकरणी डोंबीवली विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला बेड्या ठोकल्या. सिद्धार्थ शिंदे असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे.

दुसऱ्याचं मुलीशी लग्न

चार वर्षापूर्वी पीडित मुलीची एका लग्नादरम्यान भेट झाली. मुलीच्या आईवडिलांना लग्न करत आल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले असल्याची पोलिसांची माहिती आहे.

YouTube video player

हे सुद्धा वाचा

एकीशी चार वर्षांपूर्वी केला साखरपुडा

डोंबीवलीत राहणार सिद्धार्थ शिंदे या तरुणाला गेले 4 वर्षापूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरुणी दिसली. त्याला तिथेच तिच्यावर प्रेम झाले. तिच्याशी लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आई-वडिलांना सांगून पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

नवरदेवाची थेट ठाण्यात वरात

मात्र तिच्याशी लग्न न करता एका दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठले. सिद्धार्थ, त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. डोंबीवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला आहे. अशी माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.

महिलेने तीन आरोपींच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीआय भालेराव तपास करत आहेत. पहिल्या प्रेससीला माहिती झाली. तिचा प्रियकर दुसरे लग्न करतो. त्यामुळे तिने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलेच धारेवर धरले.